
बाबा रामदेव यांच्या पतंजलीद्वारे आयुर्वेदच्या जुन्या पद्धतीने घरा-घरात पोहचवण्यात मोठी भूमिका निभावलेली आहे. मग तो त्वचा विकार असो किंवा आरोग्याच्या इतर समस्या. आज आपल्याला प्रत्येक पतंजलीचे प्रोडक्ट सहज स्टोर्सवर आणि ऑनलाईनच्या पोर्टल्सवर मिळतात. बाबा रामदेव यांच्या योग एज्युकेशन आणि नैसर्गिक पदार्थांपासून तयार झालेल्या प्रोडक्ट्सनी हेल्थ प्रॉब्लेमच्या सोल्यूशनने अनेक लोकांच्या जीवनात बदल झाला आहे. आजच्या धावपळीच्या जीवनात फिजिकल हेल्थ सोबत मानसिक आरोग्य देखील प्रभावित होत आहे. यापासून आराम मिळण्यासाठी योग एक चांगला पर्याय असून यात ब्रिदींग टेक्निक खूपच फायदेमंद मानला जाते,यासाठी पतंजलीचे फाऊंडर बाबा रामदेव यांनी काही असे प्राणायम सांगितले आहेत. या प्राणायममुळे तुमची ओव्हरऑल हेल्थ वेलबिंगला दुरुस्त करण्यात हेल्पफुल ठरेल.
स्ट्रेस, चिंता यामुळे तुम्ही जर मानसिकदृष्ट्या त्रस्त असाल तर मेंटल हेल्थला आणखी चांगले करण्यासाठी ब्रिदींग तंत्राचा सहारा घेऊ शकता. यामुळे तणाव, चिंता सह नकारात्मक विचार कमी करण्यात देखील मदत मिळेल. वास्तविक प्राणायम दरम्यान श्वासांना एक नियमित लयीत ठेवले जाते. ज्यामुळे मेंदूपर्यंत ऑक्सीजनचा प्रवाह चांगला होतो. आणि मन शांत करण्यास मदत मिळते. चला तर पाहूयात बाबा रामदेव यांनी सांगितलेले 5 प्राणायम
बाबा रामदेव यांच्या पतंजली वेलनेसच्या मते अनुलोम-विलोम एक पॉवरफुल ब्रिदिंग तंत्र ( प्राणायम ) आहे. हा केल्याने शरीरात ऑक्सिजनचा प्रवाह चांगला होतो. आणि बीपी नियंत्रित करण्यात मदत मिळते. ज्यामुळे तुमचे मन शांत होते. हे आसन करण्यासाठी तुम्हाला सुखासनात बसावे लागेल. नंतर आपल्या एका हाथाने एक नाकपुडी बंद करुन दुसऱ्या नाकपुडीने श्वास आत खेचावा. आता बंद नाकपुडी खोलून तिने श्वास सोडावा. आता ज्या नाकपुडीने श्वास खेचलाय ती बंद करावी.ही क्रिया पुन्हा करत राहावी.
या प्राणायाममध्ये ध्यान आसनात बसून स्वत:ला एकदम शांत ठेवावे, आणि नंतर सहजतेने श्वास हळूहळू सोडणे आणि खेचणे अशा क्रिया आहे. त्यामुळे तुमची फु्प्फुसे एक्टीव्ह होतात आणि संपूर्ण शरीरास एनर्जी मिळते.तसेच आपण मेंटली देखील रिलॅक्स होतो.
पतंजली वेलनेसच्या मते हा प्राणायम करताना संपूर्ण लक्ष लॅक्सेटिव्ह वर द्यावे लागते, परंतू सुरुवातीला यास पूरक बनवण्याचा प्रयत्न करु नये. कपालभाती एक्टीव्ह पद्धतीने श्वास घेणे आणि सोडण्यावर आधारित आहे. हा प्राणायम तुमच्या हृदयापासून ते फुप्फुसाशिवाय तुमची मानसिक आरोग्य सुधारण्यास देखील महत्वाचा आहे.
मेंटल वेल बीईंग सुधारण्यासाठी भ्रमरी प्राणायम चांगला असतो. या दोन्ही हाथ डोळ्यांवर ठेवून 3 ते 5 सेकंदाच्या वेळेत लयबद्ध श्वास घ्यावा. या दरम्यान ओमची उच्चारणा करावी
मनाची शांती आणि स्ट्रेसला कमी करण्यासह झोपेचा पॅटर्न सुधारण्यासाठी तुम्ही उज्जायी प्राणायम करु शकतात. हे तुमच्या पचन आणि फुप्फुसांना फायदा पोहचवते. या आसनाला करण्यासाठी धान्य मुद्रेत बसून दोन्ही नाकपुड्यांनी श्वास घेऊन कंठाला आकुंचन करायचे आहे. या दरम्यान घोरण्यासारखा ध्वनी निघत असतो. यात उजव्या आणि डाव्याबाजूला श्वास सोडावा.