जे टाटा-अंबानी करु न शकले ते पतंजलीने केले, LIC ची केली चांगली कमाई
बातम्यानुसार पतंजलीने एलआयसीला जुलै महिन्यात १४ टक्के रिटर्न दिलेला आहे. जर यास रुपयात पाहायचे झाले तर एलआयसीच्या पोर्टफोलिओत पतंजलीच्या गुंतवणूकीच्या व्हॅल्यूत ७६८ कोटी रुपयांची वाढ झाली आहे. चला तर पाहूयात अखेर रिपोर्ट काय सांगतो ते पाहूयात..

देशातील सर्वात मोठी इन्स्टीट्यूशनल इन्व्हेस्टर एलआयसीला जुलै महिन्यात ६६ कोटींचे नुकसान झाले आहे. हे नुकसान देशातील मोठ्या ब्ल्यूचिप कंपन्यांकडून झाले आहे. ज्यात मुकेश अंबानी यांची रिलायन्स इंडस्ट्रीज, टाटा ग्रुपची सर्वात मोठी कंपनी टीसीएस, एक्सिस बँक, एचसीएल, टेक्नॉलॉजीस,इन्फोसिस, कोटक महिंद्र बँक, आयडीबीआय बँक आदी सामील आहेत. तर दुसरीकडे देशाची प्रमुख एफएमसीजी कंपन्यांपैकी एक पतंजली फूड्सने एलआयसीची कमाई करण्यात कोणतीही कसूर सोडलेली नाही. याचा अर्थ देशाच्या ब्लुचिप कंपन्या एलआयसीसाठी नुकसानकारक ठरल्या असताना, दुसरीकडे पतंजली एलआयसीसाठी फायद्याचा सौदा ठरली आहे.चला तर पाहूयात अखेर पतंजलीने एलआयसीला किती रिर्टन दिले आहेत ?
पतंजलीने एलआयसीची किती कमाई केली
देशातील प्रमुख एफएमसीजी कंपन्यांपैकी एक पतंजली फूड्सने भलेही एलआयसीने भलेही तसे रिटर्न दिलेले नसले तरी, एलआयसीच्या पोर्टफोलियोत पतंजली त्या कंपन्यांत जरुर समाविष्ट झाली ज्यांनी जुलैच्या महिन्यात बाजारात घसरण सुरु असतानाही एलआयसीला परतावा दिला आहे. शेअर बाजाराच्या आकड्यांनुसार पतंजलीने एलआयसीला जुलै महिन्यात १४ टक्के रिटर्न दिला आहे. जर यास रुपयांत पाहायचे झाल्यास एलआयसीच्या पोर्टफोलियोत पतंजलीच्या गुंतवणूकीची व्हॅल्यूत ७६८ कोटी रुपयांची वाढ झाली आहे. तसे पतंजली शिवाय एलआयसीला आयआयसीआय बँक आणि एचडीएफसी बँकेनेही परतावा दिला आहे. दुसरीकडे जेएसडब्ल्यू स्टील, मारुती सुझुकी आणि अंबूजा सिमेंट्सने देखील पॉझिटीव्ह रिटर्न दिला आहे.
जुलैमध्ये पतंजलीचा किती फायदा
पतंजलीचा शेअरची तुलना केली केली तर जुलैमध्ये कंपनीला मोठा लाभ झाला आहे. जून अखेरच्या कामकाजाच्या दिवशी पतंजली फूड्सचे शेअर १,६५० रुपयांवर होते. जे ३१ जुलै रोजी १,८८२.४० रुपयांवर पोहचले होते. याचा अर्थ पतंजलीच्या शेअरमध्ये २३२.०५ रुपयांची वाढ पाहायला मिळाली आहे. जर कंपनीच्या मार्केट कॅपचा विचार केला तर यात चांगली वाढ पाहायला मिळाली आहेय ३० जूनला कंपनीची बाजारमुल्य ५९,८२६.२३ कोटी रुपये पहायला मिळाले. जे ३१ जुलै रोजी वाढून ६८,२३८.१९ कोटी रुपये झाले होते. याचा अर्थ कंपनीची व्हॅल्युएशन एका महिन्यात ८,४११.९६ कोटी रुपयांचा वाढ पाहायला मिळाली.
कंपनीच्या शेअरची सद्यस्थिती ?
जर पतंजली कंपनीच्या शेअरची सद्यस्थितीचा विचार केला तर ५ जुलै रोजी कंपनीचा शेअर दुपारी १२ वाजून २० मिनिटांवर एक टक्के घसरणीनंतर १,८४४.०५ रुपयांवर कामकाज करीत होता. तर कंपनीचा शेअर १,८३९.६५ रुपयांसह दिवसाच्या लोअर लेव्हलवरही गेला. तसेच कंपनीच्या शेअरची सुरुवात १,८५४ रुपयांच्या घसरणीने सुरु झाली. तर सोमवारी कंपनीचा शेअर १,८६२.६० रुपये पाहायला मिळाला. याचा अर्थ ऑगस्टच्या महिन्यात कंपनीचा शेअर २.२७ टक्के घटला.
