Health Tips : तुम्हालाही आहे का गॅसेसचा त्रास? आजपासून या 6 पदार्थांपासून रहा दूर

पोटात गॅस तयार होणे ही एक सामान्य समस्या आहे. अनेकवेळा काही पदार्थ खाल्ल्याने ॲसिडिटीचा त्रास होतो. कोणत्या पदार्थांचे सेवन केल्याने तुम्हाला गॅसचा त्रास होऊ शकतो हे जाणून घेऊया.

Health Tips : तुम्हालाही आहे का गॅसेसचा त्रास? आजपासून या  6 पदार्थांपासून रहा दूर
Image Credit source: Freepik
| Updated on: Feb 01, 2023 | 8:19 AM

नवी दिल्ली – बदलती जीवनशैली आणि खाण्याच्या अयोग्य सवयी यामुळे गॅसची (gases in stomach) समस्या सामान्य झाली आहे. आजकाल ही समस्या सर्व वयोगटातील लोकांमध्ये दिसून येते. अनेक वेळा असे अन्नपदार्थ (food that can increase gas problem) खाल्ले जातात, ज्यामुळे गॅसेसची समस्या आणखी वाढते. अशा परिस्थितीत जेवणाची काळजी (health care) घेतल्यास गॅसच्या समस्येपासून आराम मिळू शकतो. कोणत्या पदार्थांचे सेवन केल्याने तुम्हाला गॅसचा त्रास होऊ शकतो हे जाणून घेऊया.

1) दुग्धजन्य पदार्थांचे अधिक प्रमाणात सेवन करणे

दुग्धजन्य पदार्थांमध्ये लैक्टोज असते, जे सहज पचण्यास कठीण असते. जर तुम्हाला आधीच गॅसची समस्या असेल तर तुम्ही दूध, दही, पनीर इत्यादींचे कमी प्रमाणात सेवन केले पाहिजे.

2) आंबट फळांचे सेवन करणे

संत्री, द्राक्षे, मोसंब इत्यादी आंबट फळे रिकाम्या पोटी खाणे टाळा. त्यामुळे पोटात गॅस तयार होण्याची शक्यता असते.

3) बीन्स खाणे टाळा

तज्ज्ञांच्या मते, बीन्समध्ये रॅफिनोज जास्त प्रमाणात आढळते, जे पचण्यास थोडे कठीण असते. यामुळे पोटात गॅसचा त्रास होऊ शकतो.

4) मुळा खाणे टाळा

मुळा हा पचनसंस्थेसाठी फायदेशीर मानला जातो, मात्र याचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने पोटात गॅसचा त्रास होऊ शकतो, त्यामुळे मुळा मर्यादित प्रमाणात खाल्ला पाहिजे.

5) चहा आणि कॉफीचे अतिसेवन करणे टाळा

चहा आणि कॉफीमध्ये कॅफिन असते, ज्यामुळे पोटात ॲसिडिटी होते. त्यामुळे चहा-कॉफीचे जास्त प्रमाणात सेवन टाळा.

6) डाळ

डाळींमध्ये प्रथिने जास्त प्रमाणात आढळतात, परंतु अनेक कडधान्यांमुळे पोटात गॅसही निर्माण होतो. उदाहरणार्थ, काळे मसूर आणि तूरडाळीमुळे ॲसिडिटीचा त्रास होऊ शकतो.