Health : किडनी फेल होण्याआधी शरीर देतं ‘हे’ संकेत… वेळीच लक्षणं ओळखा

| Updated on: Apr 15, 2022 | 11:52 AM

किडनी हा आपल्या शरीराचा एक महत्वाचा अवयव आहे, किडनीच्या आरोग्यावर वाईट परिणाम झाला तर तो जीवघेणा ठरू शकतो. लघवीचा रंग पाहून तुम्हाला किडनीच्या कामगिरीबाबतची माहिती होउ शकते, याशिवाय काही अन्य लक्षणांच्या माध्यमातूनही तुम्ही किडनीशी संबंधित आजार ओळखू शकतात.

Health : किडनी फेल होण्याआधी शरीर देतं ‘हे’ संकेत... वेळीच लक्षणं ओळखा
किडनीचा आजार होण्यापूर्वी शरीर तसे संकेत देते. ते ओळखणे गरजेचे आहे.
Follow us on

मुंबई : धावती जीवनशैली, (Lifestyle) सकस आहाराची कमतरता, अतिरेकी मद्यपान, चुकीच्या खाणपान सवयी आदींमुळे भारतात किडनीचे आजार असलेल्या रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत आहे. भारतातील चुकीच्या आहाराच्या सवयींमुळे किडनीच्या आरोग्यावर खूप वाईट परिणाम होतो आणि हळूहळू हा महत्त्वाचा अवयव कमकुवत होऊ लागतो आणि शेवटी किडनीचं काम करणं मंदावतं. किडनी निकामी (kidney failure) झाल्यामुळे रुग्णाच्या लघवीच्या रंगात बदल होतो. किडनी निकामी होण्याचे हे प्रमुख लक्षण मानले जाते. याशिवाय किडनी निकामी होण्याची इतरही अनेक लक्षणं (symptoms) शरीराला जाणवत असतात. ते वेळीच ओळखून त्यावर निदान करणे गरजेचे असते. अनेक घटनांमध्ये किडनी बरीच खराब झाल्यावर रुग्णाला त्याबद्दलची माहिती मिळत असते. परिणामी हातातील वेळ निघून गेलेली असते व नंतर डायलिसिसची वेळ येते.

किडनीचे आरोग्य बिघडल्यावरची सुरुवातीची लक्षणं

मद्यपान, उच्च रक्तदाब, मधुमेह किंवा काही औषधे घेतल्यास किडनी निकामी होऊ शकते. किडनीच्या आजाराची लक्षणं शरीराच खूप नुकसान झाल्यानंतर दिसतात. सुरुवातीची काही लक्षण पुढील प्रमाणे :

1) कमी लघवी लागणे.
2) सांधेदुखीचा त्रास होणे.
3) धाप लागणे.
4) लघवीचा रंग बदलणे.

किडनी निकामी झाल्यावरची लक्षणं

1) डोकेदुखी होणे.
2) अंगाला खाज सुटणे.
3) दिवसभर थकवा जाणवने.
4) रात्री झोपण्यास अडचण निर्माण होणे.
5) वजन कमी होणे किंवा भूक न लागणे.
6) स्मरणशक्ती कमी होणे.
7) एकाग्रतेचा अभाव.

लघवीच्या रंगात बदल

आपल्या लघवीचा रंग किडनीबद्दल काही संकेत देऊ शकतो. याकडे दुर्लक्ष करू नका, हे किडनी निकामी होण्याचे मोठे लक्षण असू शकते. अशी लक्षण आढळल्यास डॉक्टरांशी त्वरित संपर्क साधा.

लघवीचा रंग कसा ओळखावा?

स्वच्छ किंवा फिकट पिवळा रंग – शरीर चांगले हायड्रेटेड आहे.
गडद पिवळा रंग – शरीरात पाण्याची कमतरता म्हणजेच निर्जलीकरण.
केशरी रंग – शरीरात पाण्याची तीव्र कमतरता किंवा रक्तातील पित्ताचे लक्षण.
गुलाबी किंवा लाल रंग – लघवीतील रक्तामुळे किंवा स्ट्रॉबेरी आणि बीटरूट सारखे पदार्थ खाल्ल्यामुळे.
लघवीतील फेस – लघवीतील प्रथिनांचे लक्षण आणि किडनी निकामी सारख्या किडनीच्या आजाराचे लक्षणं.

संबंधित बातम्या :

Health Benefits Of Flax Seeds : सुपर फूड अळशी, रोज 1 चमचा अळशी खाल्ल्याने होतील चमत्कारिक फायदे

सावध व्हा! कोरोनाने पुन्हा डोके वर काढले, ‘या’ शहरांमधील मुलं होताय बाधित

गर्भधारणेतील ‘ही’ पाच लक्षणं आहेत अगदी सामान्य…असे होतात शारीरिक बदल