काळपट अंडरआर्म्समुळे आहात त्रस्त…मग करा हे घरगुती उपाय!

| Updated on: Jan 12, 2022 | 12:48 PM

Skin care काळवंडलेल्या अंडरआर्म्समुळे तुम्ही खूप त्रस्त आहात?, यापासून तुम्हाला सुटका हवी आहे तर आज तुम्हाला काही घरगुती उपाय सांगणार आहोत. जे सहज आणि सोपे असून ते केल्यास तुमचे अंडरआर्म्स सुंदर दिसायला लागतील.

काळपट अंडरआर्म्समुळे आहात त्रस्त...मग करा हे घरगुती उपाय!
Follow us on

काळपट अंडर आर्म्समुळे अनेक महिला पुरुष त्रस्त असतात. या काळपट अंडरआर्म्समुळे हवे तसं कपडे ते घालू शकत नाही. महिला तर आवड असूनही स्लीव्हलेस कपडे घालत नाही. पण आता तुमच्या किचनमध्ये असे काही पदार्थ आहेत ज्यांचा वापर केल्यास या समस्येपासून मुक्तता मिळू शकते. त्यामुळे तुम्ही टेन्शन न घेता हे सोपे घरगुती उपाय करा आणि काळवंडलेल्या अंडर आर्म्सला गूड बॉय म्हणा. पण एक गोष्ट लक्षात ठेवा काखेतील त्वचा ही नाजूक असते त्यामुळे कुठल्याही उपाय करताना त्यामुळे त्वचेचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्या.

हे उपाय करा

लिंबाचा रस – काळेपणा दूर करण्यासाठी लिंबाचा रस हे सर्वात उत्तम उपाय आहे. त्यामुळे काखेतील काळेपणा दूर करण्यासाठी 3 चमचे लिंबाचा रस घ्या आणि त्यात साखर मिक्स करा. या मिश्रणाने काखेत 10 मिनिटं मसाज करा.

हळद-बेसन-दही पॅक – या पॅकेचा काखेतीली काळेपणा दूर करण्यासाठी खूप फायदा होतो. हा पॅक साधारण 10 मिनिटं काखेत लावून ठेवा नंतर पाण्याने धुवा.

बटाट्याचा रस – काळेपणा दूर करण्यासाठी बटाट्याचा रस सर्वोत्तम मानला जातो. एका बटाट्याचा किस करून त्याचा रस काढून घ्या. आणि या रसने काखेत मसाज करा. हे सगळे उपाय आठवड्यातून दोन ते तीन वेळा करा. तर याचा फायदा होईल.

ओट्स-मध – ओट्स आणि मध एकत्र करुन या पॅकने काखेत स्क्रब करा आणि नंतर थंड पाण्याने स्वच्छ धुवा. या पॅकमुळे तुमच्या काखेतील घाण निघून जाते आणि काळपटपणा हळूहळू नाहीसा व्हायला लागतो.

इनो – इनोमध्ये लिंबाचा रस आणि मध मिक्स करा. आणि हे मिश्रण सुमारे 2 ते 3 मिनिटे अंडरआर्म्सवर लावून ठेवा.

कोरफड – कोरफडीचा गर काढून त्याची पेस्ट तयार करा आणि ही पेस्ट 10 ते 15 मिनिटांसाठी अंडर आर्मवर लावून ठेवा.

बदाम तेल – बदाम तेलाचा मसाज काखेत केल्याने फायदा होतो.

काकडी – काकडीची पेस्ट बनवा आणि या पेस्टने काखेत मसाज करा.

 अंडरआर्म्स काळपट का पडतात?

– हेअर रिमूव्हल क्रीमच्या अति वापर
– काखेतील केस काढण्यासाठी रेझरचा वापर करणे
– घट्ट कपडे घालणे
– काखेत सतत जास्त घाम येणे
– हार्मोनलमधील असंतुलनामुळेही काखेत काळपटपणा येतो.
– डिओड्रंटचा अती वापर

टीप : या बातमीतील आरोग्यविषयक सल्ला प्राथमिक माहितीच्या आधारावर आहे, या माहितीचा वापर करण्यापूर्वी आपल्या फॅमिली डॉक्टरांचा सल्ला जरुर घ्यावा

इतर बातम्या-

VIDEO : जेव्हा समुद्रात अचानक हवेत उडू लागतो लष्कराचा जवान; लोक म्हणतायत, कलियुगात येतेय त्रेतायुगाची फिलिंग

Nashik Corona|नाशिकमध्ये दिवसात कोरोनाचे हजारापेक्षा जास्त रुग्ण; काय आहे आजची नेमकी आकडेवारी?