AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO : जेव्हा समुद्रात अचानक हवेत उडू लागतो लष्कराचा जवान; लोक म्हणतायत, कलियुगात येतेय त्रेतायुगाची फिलिंग

एक व्हिडिओ (Video) सध्या सोशल मीडिया(Social Media)वर खूप व्हायरल होतोय, जो पाहून आश्चर्यचकित व्हायला होते. या व्हिडिओमध्ये लष्कराचा एक जवान समुद्राच्या मध्यभागी हवेत उडताना दिसतोय.

VIDEO : जेव्हा समुद्रात अचानक हवेत उडू लागतो लष्कराचा जवान; लोक म्हणतायत, कलियुगात येतेय त्रेतायुगाची फिलिंग
लष्कराचा जवान
| Updated on: Jan 12, 2022 | 12:33 PM
Share

त्रेतायुग (Treta Yuga) आणि द्वापर युगा(Dwapara Yuga)त काहीही अशक्य नव्हतं. त्यावेळी ऋषी-मुनी आपल्या मनाच्या गतीनं कुठेही येवू आणि जाऊ शकत होते. याशिवाय आकाशात उडणं हा त्यांच्या डाव्या हाताचा खेळ होता. कोणत्याही आधाराशिवाय उड्डाण करून ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहज जाऊ शकत होते. आजच्या काळात म्हणजे कलियुगा(Kaliyuga)त असं काहीही किमान आजवर तरी शक्य झालेलं नसलं तरी मानवानं एवढी प्रगती केलीय, की तंत्रज्ञानाच्या मदतीनं माणसं सहज आकाशात उडू शकतात. असाच एक व्हिडिओ (Video) सध्या सोशल मीडिया(Social Media)वर खूप व्हायरल होतोय, जो पाहून आश्चर्यचकित व्हायला होते. या व्हिडिओमध्ये लष्कराचा एक जवान समुद्राच्या मध्यभागी हवेत उडताना दिसतोय.

वैशिष्ट्यपूर्ण… सोशल मीडियावर नेहमीच विविध प्रकारचे वैशिष्ट्यपूर्ण व्हायरल होत असतात, त्यातले काही वैशिष्ट्यपूर्ण असतात. व्हायरल होत असलेला हा व्हिडिओही तसाच आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की समुद्रात लष्कराचं एक जहाज धावतंय. त्याच्या मागे एक छोटी बोटही धावतेय. यामध्ये काही लष्कराचे जवान बसले आहेत. त्याच बोटीतून एक तरूण अचानक आकाशात उडू लागतो आणि मोठ्या बोटीसमोर इकडे तिकडे घिरट्या घालू लागतो. नंतर तो मोठ्या जहाजावर उतरतो.

‘मी ही करू शकलो असतो, पण…’

अचंबित करणारा हा व्हिडिओ आहे. हा उत्तम व्हिडिओ आयएएस अधिकारी डॉ. एमव्ही राव यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर शेअर केला आहे आणि कॅप्शनमध्ये लिहिलं, की ‘मी हे करू शकलो असतो. अर्थात, कधी कधी मी हे करतो… माझ्या स्वप्नात.

मजेशीर कमेंट्स

39 सेकंदांचा हा व्हिडिओ आतापर्यंत 44 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेलाय. तर 2800हून अधिक लोकांनी या व्हिडिओला लाइकही केलं आहे. त्याचबरोबर व्हिडिओ पाहून अनेकांनी मजेशीर कमेंटही केल्या आहेत. एका यूझरनं लिहिलं, की ‘सर, मीही अनेकवेळा स्वप्नात उडलो आहे. होय, मी उठल्यानंतर मला आकाशातून अंथरुणावर पडल्याचं दिसतं’, तर दुसर्‍या यूझरनं टिप्पणी केली, ‘आम्ही जो खेळ खेळायचो तो ‘फ्लॅपी बर्ड’. म्हणजे तुम्हाला पक्षी उडवायचा आहे तर स्क्रीनला वारंवार स्पर्श करावा लागतो.

‘अनेक लोक हवेतच राहतात’

आणखी एका यूझरनं लिहिलं, की ‘उडणाऱ्या माणसाला कलियुगात त्रेतायुग वाटत असेल’, तर आणखी एका यूझरनं मजेशीरपणे लिहिलंय, की ‘ही काही मोठी गोष्ट नाही. इथे अनेक लोक फक्त ‘हवेत’ राहतात… कोणत्याही उपकरणाशिवाय!!’.

कुत्र्याला स्केटिंग करताना पाहिलंय का? हा मजेदार Video सोशल मीडियावर होतोय Viral

सापाशी मस्ती पडली भारी! अंगावर शहारे आणणारा Video होतोय Viral

Viral : मुलीसोबत स्टंट करणं पडलं महागात, हा Video पाहून हसू आल्याशिवाय राहणार नाही

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.