सापाशी मस्ती पडली भारी! अंगावर शहारे आणणारा Video होतोय Viral

सध्या सोशल मीडिया(Social Media)वर एक व्हिडिओ व्हायरल (Viral) होत आहे. यात एक मुलगा सापाशी पंगा घेतो. व्हिडीओमध्ये हा मुलगा सापा(Snake)ला हातात घेऊन त्याच्या तोंडावर फुंकर मारण्याचा प्रयत्न करतो. यानंतर साप जे काही करतो, त्यानंतर तुमच्या हृदयाचे ठोके नक्कीच वाढू शकतात.

सापाशी मस्ती पडली भारी! अंगावर शहारे आणणारा Video होतोय Viral
सापाचा मुलाला दंश

सापा(Snake)चं नाव ऐकताच अनेकांनी भीतीनं गाळण उडते. एखाद्याला साप चावला तर त्याचा मृत्यूदेखील होऊ शकतो. म्हणूनच माणूस यापासून दूर राहण्यातच स्वतःला धन्य समजतो. सध्या सोशल मीडिया(Social Media)वर एक व्हिडिओ व्हायरल (Viral) होत आहे. यात एक मुलगा सापाशी पंगा घेतो. व्हिडीओमध्ये हा मुलगा सापाला हातात घेऊन त्याच्या तोंडावर फुंकर मारण्याचा प्रयत्न करतो. यानंतर साप जे काही करतो, त्यानंतर तुमच्या हृदयाचे ठोके नक्कीच वाढू शकतात. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हीही म्हणाल, की साप खेळण्याची गोष्ट नाही.

सापाच्या तोंडावर मारतो फुंकर सोशल मीडियाचं जग अद्भुत आहे. काही लोक त्यांच्या फोटो आणि व्हिडिओवर लाइक्स आणि कमेंट्स मिळविण्यासाठी जीव धोक्यात घालण्यास मागेपुढे पाहत नाहीत. आता व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ पाहा. हा व्हिडिओ एका कारखान्यात शूट करण्यात आल्याचं दिसतंय. एका मुलानं हातात साप घेतल्याचं दिसतं. सापही खूप मोठा दिसतोय. पण हा मुलगा त्या सापाच्या तोंडावर बिनदिक्कतपणे फुंकर मारत राहतो. त्यामुळे साप चिडतो. मुलानं मान पकडली असल्यानं साप काही करू शकत नाही. पण मुलानं आपली पकड सैल करून सापाला डोक्याजवळ आणलं. तेवढ्यात साप त्याला लगेच चावला. हे दृश्य खरोखरच भयावह आहे.

ट्विटरवर शेअर हा व्हिडिओ ट्विटर या मायक्रो-ब्लॉगिंग साइटवर @Folico_ नावाच्या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. 6 डिसेंबर रोजी अपलोड केलेला हा व्हिडिओ आतापर्यंत 24 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे.

काहींनी तर सापाचंच कौतुक केलं.. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर काही यूझर्सनी साप खेळण्याची गोष्ट नाही, असा सल्ला दिलाय. तर काही जणांनी त्या मुलाची कृती मूर्खपणाची असल्याचं म्हटलंय. काहींनी तर सापाचंच कौतुक केलंय. अशा मूर्खांना असाच धडा मिळायला हवा, असं लोक म्हणतायत. मात्र, काही यूझर्सनी त्या मुलाबद्दल चिंताही व्यक्त केलीय.

Viral : मुलीसोबत स्टंट करणं पडलं महागात, हा Video पाहून हसू आल्याशिवाय राहणार नाही

Video | तो आला, सगळ्यांनी त्याला पाहिलं आणि सगळे जागच्या जागीच थांबले! फक्त एकाला सोडून, कोण होता तो?

नाव किली पॉल. काम, नुसती Instagramवर हवा करायची भाव! आता ‘Saami Saami’वर ठेका धरलाय राव

Published On - 11:13 am, Wed, 12 January 22

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI