Viral : मुलीसोबत स्टंट करणं पडलं महागात, हा Video पाहून हसू आल्याशिवाय राहणार नाही

एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Viral) होतोय, ज्यामध्ये एक मुलगा आणि मुलगी धोकादायक वेगानं बाइक चालवतात आणि रहदारी असलेल्या रस्त्यावर स्टंटबाजी करतात, परंतु त्यांच्यासोबत असं काही घडतं की तुम्ही पाहतच राहाल.

Viral : मुलीसोबत स्टंट करणं पडलं महागात, हा Video पाहून हसू आल्याशिवाय राहणार नाही
स्टंटबाज

सोशल मीडिया(Social) Media)वर प्रसिद्ध होण्यासाठी लोक काय करतील, याचा काही नेम नाही. काही लोकांना अभिनय, नृत्य आणि गायन करून प्रसिद्ध व्हायचं असतं, तर काही लोक असे आहेत जे थोड्या लोकप्रियतेसाठी आपला जीव पणाला लावतात. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Viral) होतोय, ज्यामध्ये एक मुलगा आणि मुलगी धोकादायक वेगानं बाइक चालवतात आणि रहदारी असलेल्या रस्त्यावर स्टंटबाजी करतात, परंतु त्यांच्यासोबत असं काही घडतं की तुम्ही पाहतच राहाल.

स्टंट फसला आजकाल जगभरात स्टंटबाजी(Stunt)चा ट्रेंड खूप वाढला आहे. विशेषत: तरुणांमध्ये त्याची क्रेझ अधिक पाहायला मिळते, मात्र स्टंटबाजी हा लहान मुलांचा खेळ नाही. कुठलाही स्टंट करायला खूप सराव करावा लागतो, मग त्यात कुठेतरी परफेक्शन येतं. थोडीशीही चूक झाली तर तो स्टंट फसणार हे नक्की आणि त्याचवेळी दुखापतही होते. आता हा व्हिडिओ फक्त बघा. इथं एक मुलगा आपल्या मैत्रिणीला इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करतोय, पण नंतर त्याचा स्टंट फसतो आणि थेट जमिनीवर पडतो.

अचानक वाढवतो वेग व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता, की एक मुलगा आणि मुलगी रस्त्यावर बाइकवरून जात आहेत आणि यादरम्यान मुलगा त्याच्या बाइकचा वेग वाढवतो, त्यानंतर काही क्षणानंतर लगेच पुढचा ब्रेक लावतो. त्यामुळे दुचाकीचं मागचं चाक हवेत वर येण्याऐवजी उलटं पडतं.

इन्स्टावरून शेअर मुलगा ज्याप्रकारे बाइकवरून पडला, त्यावरून अंदाज येतो, की त्याला खूप दुखापत झाली. लोकांच्या कमेंट्सबद्दल बोलताना काही लोक म्हणतात, की जे स्मार्ट होण्याचा प्रयत्न करतात, त्यांच्या बाबतीत असंच घडतं. कमेंट सेक्शनमध्ये हसणारे इमोजीही पाहायला मिळत आहेत. अवघ्या पाच सेकंदांचा हा व्हिडिओ punjabi_industry__ नावाच्या अकाऊंटवरून सोशल मीडिया साइट इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. आतापर्यंत तो हजारो वेळा पाहिला गेला आहे, तर शेकडो लोकांनी या व्हिडिओला लाइकदेखील केलंय.

Video | तो आला, सगळ्यांनी त्याला पाहिलं आणि सगळे जागच्या जागीच थांबले! फक्त एकाला सोडून, कोण होता तो?

नाव किली पॉल. काम, नुसती Instagramवर हवा करायची भाव! आता ‘Saami Saami’वर ठेका धरलाय राव

Interesting | वैभववाडीच्या बाजारात कॉलेजच्या मुली भाज्या का विकत होत्या? शिक्षा केली होती काय? नेमका काय प्रकार?

Published On - 10:48 am, Wed, 12 January 22

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI