
दररोज व्यायाम करणे हे हृदयाच्या आरोद्यासाठी खूप फायदेशीर आहे. हृदय निरोगी ठेवण्यासाठी आणि हार्ट अटॅकचा धोका टाळण्यासाठी दररोज किती वेळ चालले पाहिजे हे आज आपण जाणून घेणार आहोत.

हार्ट अटॅचा धोका टाळण्यासाठी तुम्ही आठवड्यातून 200 मिनिटे जलद चालणे पाहिजे. 200 मिनिटे म्हणजे तुम्ही आठवड्यातून पाच दिवस प्रत्येकी 40 मिनिटे चालायला हवं.

दररोज 40 मिनिटे चालल्याने हृदयविकाराचा धोका कमी होतो. सामान्य चालीने चालण्यापेक्षा वेगाने चालणे हृदयासाठी फायदेशीर असते. त्यामुळे तुम्ही जलद चालून हा धोका कमी करु शकता.

हृदय चांगले ठेवण्यासाठी जलद चालणे, एरोबिक्स, पोहणे, सायकलिंग आणि धावणे हे व्यायाम फायदेशीर आहेत. तुम्ही दररोज 40 मिनिटांपेक्षा जास्त काळ जलद चाललात तर तुमचे वजन देखील कमी होऊ शकते.

तुम्हाला हृदयविकाराचा झटका टाळायचा असेल, तर दररोज 40-45 मिनिटे जलद चालणे करा. यामुळे हृदय, यकृत आणि मेंदू निरोगी राहतील. तसेच कोलेस्टेरॉल, रक्तदाब आणि मधुमेहाचा धोका देखील कमी होईल.