
केळी : बदलत्या ऋतूमध्ये केळीचे सेवन खूप फायदेशीर ठरू शकते. तज्ज्ञांच्या मते, यामध्ये असलेले फायबर पोटासाठी चांगले मानले जाते. मात्र, जास्त प्रमाणात केळी खाल्ल्याने बद्धकोष्ठतेची समस्या निर्माण होऊ शकते.

नारळ पाणी : बदलत्या ऋतूत तुम्हाला पोटाशी संबंधित काही समस्या असतील तर नारळाच्या पाण्याने आराम मिळू शकतो. नारळाचे पाणी शरीराला हायड्रेट ठेवते.

दही आणि जिरे : पोट निरोगी ठेवण्यासाठी दही हा एक उत्तम स्रोत मानला जातो. उन्हाळ्यात तर तुम्ही नियमितपणे आहारात दह्याचा समावेश करू शकता. दही आणि जिऱ्याचे एकत्रित सेवन केल्यास तुमची पोटाच्या विविध समस्यांपासून सुटका होऊ शकते.

लिंबू पाणी : लिंबू पाण्याचे नियमित सेवन केल्याने पोट निरोगी राहते. लिंबामध्ये असलेल्या काही गुणधर्मांमुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत होते. तसेच लिंबू पाण्यामुळे शरीर हायड्रेट राहण्यास मदत होते.

पपई : पपई पोटासाठी रामबाण औषध आहे. तुम्हाला जर पोटाच्या काही समस्या असतील तर तुम्ही इतर फळे जास्त न खाता दिवसातून एकदा तरी पपई खावी. यामुळे तुमच्या पोटाशीसंबंधित समस्या दूर होण्यास मदत होईल. टीप वरील माहिती ही सामान्य ज्ञानासाठी देण्यात आली असून, कुठलेही औषधोपचार करण्यापूर्वी एकदा डॉक्टरांचा सल्ला आवश्य घ्यावा.