Weight Loss: पोटाची नको असलेली चरबी बर्न करण्यासाठी हे 3 चहा अत्यंत फायदेशीर!

| Updated on: Mar 31, 2022 | 9:50 AM

चहा (Tea) हे जगभरात लोकप्रिय पेय आहे. वजन कमी करण्यासोबतच चहा आपल्या आरोग्यासाठी देखील खूप जास्त फायदेशीर मानला जातो. चहामध्ये भरपूर अँटीऑक्सिडंट असतात. त्यासोबत व्हिटॅमिन सी (Vitamin C) देखील असते. जे आपल्या शरीरासाठी फायदेशीर आहे.

Weight Loss: पोटाची नको असलेली चरबी बर्न करण्यासाठी हे 3 चहा अत्यंत फायदेशीर!
चहा आरोग्यासाठी फायदेशीर पण या गोष्टींचा चहामध्ये समावेश करू नका.
Image Credit source: TV9
Follow us on

मुंबई : चहा (Tea) हे जगभरात लोकप्रिय पेय आहे. वजन कमी करण्यासोबतच चहा आपल्या आरोग्यासाठी देखील खूप जास्त फायदेशीर मानला जातो. चहामध्ये भरपूर अँटीऑक्सिडंट असतात. त्यासोबत व्हिटॅमिन सी (Vitamin C) देखील असते. जे आपल्या शरीरासाठी फायदेशीर आहे. नियमित चहा पिण्याने पण मधुमेह नियंत्रणात राहतो, त्याचबरोबर हृदयाच्या अनेक समस्या दूर होतात. अनेक अभ्यासातून असेही दिसून आले आहे की चहा पोटाची चरबी (Belly fat) कमी करण्यास मदत करतो. वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि आरोग्यासाठी नेमका कोणते चहा हे फायदेशीर आहे. हे आपण जाणून घेऊयात.

चला जाणून घेऊयात वजन कमी करण्यासाठीचे चहा

ग्रीन टी – ग्रीन टी हा आपल्या आरोग्यासाठी खूप चांगला आहे. ग्रीन टीचेही अनेक फायदे आहेत. ग्रीन टी पिल्याने वजन झटपट कमी होण्यास मदत होते. 12 आठवडे दिवसातून तीन कप ग्रीन टी पिल्याने कंबरेवरील चरबी कमी होते. हे एका संशोधनातून देखील सिध्द झाले आहे. यामुळे ज्यालोकांना आपले वाढलेले वजन कमी करायचे आहे. त्यांनी दिवसातून 3 कप ग्रीन टी आहारात घ्या.

ब्लॅक टी – ब्लॅक टी आपल्या शरीरात ऑक्सिडेशन होण्यास मदत करते. या ब्लॅक टीमध्ये अर्ल ग्रे टी आहे. हा चहा नियमित 3 तास प्यायल्यास शरीराच्या अनेक समस्या दूर होतील. पण त्यासोबत फॅटही कमी होते. तीन महिने हा चहा प्यायला तर कंबरेची चरबीही जाते. मात्र, कधीही हे लक्षात ठेवा की, ग्रीन टी असो वा ब्लॅक टी यामध्ये कधीही साखर टाकू नका.

आल्याचा चहा – आल्याचा चहा देखील आरोग्यासाठी फायदेशीर आहे. हा चहा आजकाल देशात खूप लोकप्रिय आहे. या चहाच्या नियमित सेवनाने वजन कमी आणि चरबी कमी होण्यास मदत होते. या चहामध्ये भरपूर अँटीऑक्सिडंट असतात. या चहामुळे आपल्या शरीराचे चयापचय वाढते. जर तुम्ही दिवसातून चार कप आल्याचा चहा घेतला तर तुम्ही 281 कॅलरीज बर्न करू शकता.

संबंधित बातम्या :

Skin Care : काळ्या पडलेल्या त्वचेला नविन लकाकी आणण्यासाठी टोमॅटोचा वापर करुन नितळ त्वचा मिळवा!

Sabja seeds : जाणून घ्या सब्जाचे आरोग्यदायी फायदे, वाचा महत्वाची माहिती!