AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Red Wine : ‘ओ हॅलो, रेड वाईन हेल्थसाठी चांगली असते’, असं जेव्हा म्हणाल तेव्हा हे मुद्दे सुद्धा त्यात वापरा !

या वाईनचे फायदे सांगणारेही अनेक आहेत आणि तोटे सांगणारेही अनेक. तोटे तर सगळेच ऐकून घेतात आणि लोकांना ते पटतात सुद्धा पण बरेचदा फायदे पटत नाहीत. पटवून देताना आपल्याकडे मुद्देही कमीच पडतात.

Red Wine : 'ओ हॅलो, रेड वाईन हेल्थसाठी चांगली असते', असं जेव्हा म्हणाल तेव्हा हे मुद्दे सुद्धा त्यात वापरा !
'ओ हॅलो, रेड वाईन हेल्थसाठी चांगली असते'Image Credit source: facebook
| Updated on: Apr 29, 2022 | 1:49 PM
Share

अल्कोहोल (Alcohol) किंवा मद्यपान का करू नये याबाबत आपल्याला कायमच सांगितलं जातं. कुठल्याही गोष्टीचा अतिरेक वाईटच असतो आणि कुठलीही गोष्ट प्रमाणात असेल तर ती उत्तमच ! काही ड्रिंक्स (Drinks) पिण्याचा सल्ला डॉक्टर (Doctor) स्वतः देतात. अर्थातच ही ड्रिंक्स आरोग्यासाठी चांगली असतात म्हणून ती प्यायचा सल्ला दिला जातो. रेड वाईनमुळे होणाऱ्या फायद्यांवर अनेकांनी संशोधनं केली. या वाईनचे फायदे सांगणारेही अनेक आहेत आणि तोटे सांगणारेही अनेक. तोटे तर सगळेच ऐकून घेतात आणि लोकांना ते पटतात सुद्धा पण बरेचदा फायदे पटत नाहीत. पटवून देताना आपल्याकडे मुद्देही कमीच पडतात. रेड वाईनचे असंख्य फायदे वाचून तुम्हीदेखील हैराण व्हाल. योग्य प्रमाणात रेड वाईन प्यायल्यास आरोग्यासाठी ती फायदेशीर ठरते. जाणून घेऊयात नेमकी काय आहेत फायदे…

रेड वाईनचे फायदे

1. रेड वाईनमध्ये आर्यन, मॅग्नेशिअम, व्हिटॅमीन बी 6 आणि व्हिटॅमीन सीची भरपूर प्रमाणात आढळतं. यामध्ये अनेक ॲक्टीव्ह अँटीऑक्सीडंट पण असतात. जे तुमची प्रतिकारकशक्ती वाढवतात.

2. रेड वाईनही काळ्या द्राक्षांपासून बनवली जाते. जी चांगलं कॉलेस्ट्रॉल वाढण्यास मदत करते. ज्यामुले तुमचं हृदय राहत निरोगी आणि वजनही संतुलित राहतं.

3. अँटीऑक्सीडंट असल्यामुळे रेड वाईन तणाव कमी करते आणि फ्री रॅडीकलपासूनही रक्षण करते. यामुळे तुमची त्वचा तुकतुकीत दिसते.

4. रेड वाईनचं सेवन हे पचनशक्तीही मजबूत करतं. मर्यादित प्रमाणात रेड वाईनचं सेवन केल्यास पोटातील बॅक्टेरिया नाश पावतात आणि पोटांचा अल्सरही कमी होतो.

5. ॲरिझोना युनिव्हर्सिटी आणि हार्वर्ड युनिव्हर्सिटीने केलेल्या एका संशोधनानुसार मधमाश्यांना रेड वाईनमधील रेजवेराट्रॉल नामक तत्वाचं सेवन करवण्यात आलं. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्या मधमाश्यांचं आयुष्य वाढलेलं आढळलं. म्हणजे दीर्घाआयुष्यासाठीही रेड वाईन उपयुक्त आहे.

6. नुकत्याच एका शोधात आढळलं आहे की, रेड वाईनच्या सेवनाने स्मरणशक्ती बाबतच्या समस्याचंही निवारण होतं.

7. रेड वाईन ब्लड क्लॉटींग म्हणजेच रक्ताच्या गुठळ्या होण्याच्या समस्येवरही गुणकारी आहे. यामुळे हार्ट अटॅक, स्ट्रोक आणि पल्मनरी एम्बोलिज्मचा धोकाही कमी होतो.

8. व्हर्जीनिया युनिव्हर्सिटीने केलेल्या एका संशोधनानुसार, आठवड्यातून एकदा एक ग्लास रेड वाईन प्यायलास कॅन्सरचा धोकाही कमी होतो. रेड वाईन कॅन्सरच्या कोशिकांच्या वाढीची शक्यता कमी करते.

9. रेड वाईनचं सेवन हे सौंदर्यासाठीही उपयुक्त मानलं जातं. काही महिलांमध्ये वाढत्या वयासोबत त्वचेची सुंदरता कमी होऊ लागते. अशा परिस्थितीत रेड वाईनचा वापर हा फेसपॅक म्हणून केल्यास उपयुक्त ठरतो.

10. डायबिटीस झालेल्या लोकांसाठी रेड वाईन खूपच फायदेशीर असतं. कारण यामध्ये ब्लड शुगर लेव्हल कमी करण्यास मदत होते.

11. रेड वाईनचं सेवन करणाऱ्या लोकांच्या दातातही कॅव्हिटीची समस्या आढळत नाही.

12. रेड वाईनमुळे हिरड्यांची सूजही कमी होते. दातांमधील बॅक्टेरियाही रेड वाईनमुळे नष्ट होतात आणि दात पहिल्यापेक्षा जास्त मजबूत होतात.

13.अल्कोहॉलच्या सेवनाने गर्भधारणेच्या क्षमतेवर वाईट परिणाम होतो असं म्हणतात. पण रेड वाईन याला अपवाद आहे. रेड वाईनमुळे महिलांमध्ये गर्भधारणेची क्षमता वाढते आणि पीरियड्ससंबंधी समस्याही दूर होतात

14. जर तुम्हाला रात्री झोप लागण्याची समस्या असेल तर रेड वाईनमुळे तुम्हाला नक्कीच मदत होईल. आठवड्यातून एकदा याचं सेवन केल्यास तुम्हाला चांगली झोप लागेल.

15. रेड वाईनच्या सेवनाने महिलांमध्ये सेक्स हार्मोन वाढवतात. ज्यामुळे त्यांची कामेच्छा वाढते. जर तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत रोमँटीक नाईट प्लॅन करत असाल तर या प्लॅनमध्ये रेड वाईनचा समावेश करायला विसरू नका.

आपण रेड वाईनच्या फायद्यांबाबत जाणून घेत असलो तरी हे विसरू नका की हा एक अल्कोहोलचाच प्रकार आहे. कोणत्याही गोष्टींचं अतिप्रमाणात सेवन केल्यास आपल्यावर चुकीचा प्रभाव पडतो. त्यामुळे याचं सेवनही मर्यादित प्रमाणात करा. तुम्ही केक किंवा चॉकलेटमध्येही रेड वाईनचा वापर करू शकता. जर तुम्हाला रेड वाईन जास्त आवडत नसेल तर तुम्ही त्याऐवजी द्राक्षांचाही तुमच्या आहारात समावेश करू शकता.

(टीप : सदर मजकूर उपलब्ध माहितीवर आधारीत आहे, याला कुठल्याही प्रकारचा सल्ला समजू नये, अधिक माहितीसाठी आपल्या डॉक्टरांचा सल्ला अवश्‍य घ्यावा.)

फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.