
Kidney Transplant :किडनी ट्रान्सप्लांट करणे खूपच जोखमीचे काम असते, परंतू यामुळे अनेकांचे प्राण वाचतात. जेव्हा कोणत्याही व्यक्तीची किडनी काम करणे बंद होते तेव्हा डायलिसिसच्या आधार घेतला जातो, त्यावरही फार काळ माणूस तग धरु शकत नाही.. तेव्हा डॉक्टर किडनी ट्रान्सप्लांटचा सल्ला देत असतात. अशात डोक्यात एक विचार येतो की नवीन किडनी शरीरात लावली जाते. परंतू रुग्णाच्या खराब झालेल्या किडनीचे काय होते ? हा प्रश्न अनेकांना बुचकळ्यात टाकतो. चला तर पाहूयात अखेर या खराब किडनीचे नेमके काय केले जाते.
Nyulangone च्या बातमीनुसार बहुतांशी प्रकरणात डॉक्टर जुन्या किडनी शरीरात तशाच सोडून देतात. वास्तविक, खराब किडनी जरी ठिक काम करु शकत नसली तरी ती शरीरास नुकसान देखील पोहचवत नाही. अशा सर्जरी करताना तिला काढण्याची गरज नसते. मेडिकल भाषेत याला “नॉन-फंक्शनल किडनी” असे म्हटले जाते. जी शरीरात कोणत्याही नुकसानाशिवाय राहू शकते. तसेच ही किडनी काळासोबत लहान लहान होत जाते. लोकांना नेहमी वाटते जुनी किडनी काढून त्याजागी नवीन किडनी ट्रान्सप्लांट केली जाते. परंतू सत्य नेमके उलट आहे. डॉक्टर नवीन किडनीला पोटाच्या खालच्या भागात म्हणजे अब्डॉमेनमध्ये लावतात. येथे ब्लड सप्लाय आणि ब्लॅडरशी कनेक्शन सहज केले जाऊ शकते. याचा अर्थ बहुतांशी रुग्णांच्या शरीरात ट्रान्सप्लांटनंतर तीन किडनी अस्तित्वात असता. दोन जुन्या आणि एक नवीन.
काही प्रकरणात मात्र किडनीला शरीरातून हटवावे लागते. किडनीत वारंवार इन्फेक्शन होत असेल, किंवा किडनीचा आकार खूपच मोठा होत असेल, वा पोटात सूज किंवा पोटदुखीला कारणीभूत ठरत असेल. जर किडनीचा कोणता आजार झाला असेल उदा. कॅन्सर अशा वेळी किडनीला हटवले जाते.अशा प्रकरणात डॉक्टर ट्रान्सप्लांटच्या आधी किंवा सोबतच जुनी किडनी काढून टाकतात. परंतू जुनी किडनी आता असेल आणि नवीन किडनी जेव्हा संपूर्ण काम सांभाळते. उदा. रक्ताला फिल्टर करणे, लघवी तयार करणे आणि शरीरातून टॉक्सिन्स बाहेर काढणे. जुनी किडनी जरी तिच्या जागी असेल तरी तिचा आपल्या शरीरात काही रोल शिल्लक रहात नाही.