
तुम्ही जेव्हा निरोगी जीवनशैलीचा अवलंब करता तेव्हा तुमच्या आहारामध्ये पौष्टिक आहार घेणे आवश्यक आहे. विशेषत: जर तुम्ही तुमच्या दैनंदिन आहारात फळे आणि सुका मेवा समाविष्ट केला असेल तर ते तुमच्या शरीराला आवश्यक पोषण आणि ऊर्जा प्रदान करतात. त्यापैकी एक म्हणजे अंजीर. अंजीर हे एक असं फळ आहे जे हजारो वर्षांपासून त्याच्या पोषक आणि औषधी गुणधर्मांमुळे वापरले जात आहे. ताजे किंवा सुकवलेले अंजीर असो, त्यांचे सेवन तुमच्या शरीरास असंख्य आरोग्य फायदे देते.
अंजीर खाण्यास रसाळ आणि गोड असल्याने चव खूप उत्कृष्ट लागते. अशातच अंजीर चवीने समृद्ध नाहीत तर फायबर, अँटीऑक्सिडेंट्स, खनिजे आणि जीवनसत्त्वे देखील भरलेले आहेत. दररोज एक अंजीर खाल्ल्याने आरोग्याच्या अनेक समस्या टाळता येतात आणि तुमचे आरोग्य सुधारते. या लेखात आम्ही तुम्हाला अंजीर खाल्ल्याने शरीराला कोणते फायदे होतात आणि तुमच्या आहारात अंजीरचे समावेश कसा करावा हे सांगणार आहोत. चला जाणून घेऊयात.
अंजीरमध्ये कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम, पोटॅशियम, फायबर, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन के आणि बी-कॉम्प्लेक्स जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात असतात. तसेच अंजीर हे अँटीऑक्सिडंट्स आणि फायटोन्यूट्रिएंट्सचा चांगला स्रोत देखील आहे. त्यामुळे अंजिराच्या सेवनाने तुमच्या शरीराला चांगले पोषक घटक मिळतात व त्याचे विविध फायदे देखील शरीराला होत असतात.
अंजीरमध्ये फायबर भरपूर प्रमाणात असतं, ज्यामुळे तुमची पचनसंस्था मजबूत होते. अंजीरच्या सेवनाने बद्धकोष्ठता, पोटदुखी आणि गॅस सारख्या समस्यांपासून मुक्त होण्यास देखील मदत होते. याव्यतिरिक्त अंजीर तुमचे पोट स्वच्छ ठेवण्यास देखील मदत करते.
अंजीरमध्ये कॅलरी कमी आणि फायबर जास्त असते, ज्यामुळे तुम्हाला जास्त काळ पोट भरल्यासारखे वाटते. वजन कमी करण्यासाठी अंजीर हे एक उत्कृष्ट पर्याय आहेत. वजन कमी करणाऱ्या लोकांनी त्यांच्या आहारात अंजीरचे नक्कीच समावेश करून दररोज त्याचे सेवन करू शकतात.
अंजीरमध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे अंजीरचे सेवन केल्याने हाडे मजबूत होतात. तसेच अंजीर हे ऑस्टिओपोरोसिससारख्या समस्या टाळण्यास देखील मदत करतात. सांधेदुखीचा त्रास असेल तर अंजीर तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते.
अंजीरमध्ये लोह भरपूर प्रमाणात असते, जे शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी वाढविण्यास मदत करतात. ॲनिमियाग्रस्त लोकांसाठी ते खूप फायदेशीर आहेत. त्यामुळे त्यांचा आहारात समावेश नक्की करा.
अंजीरचे सेवन केल्याने कोलेस्टेरॉल नियंत्रित राहण्यास मदत होते आणि हृदयरोगाचा धोका कमी होतो. त्यामध्ये पोटॅशियम भरपूर प्रमाणात असते, जे रक्तदाब राखण्यास देखील मदत करते.
अंजीरमध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात जे त्वचा चमकदार आणि तरुण ठेवण्यास मदत करतात. ते त्वचेवरील सुरकुत्या आणि काळे डाग कमी करतात. याव्यतिरिक्त अंजीर खाल्ल्याने तुमची त्वचा दीर्घकाळ चमकदार आणि तरुण राहते.
रोज सकाळी एक अंजीर खाल्ल्याने तुम्हाला त्याचे सर्वाधिक फायदे मिळतात. रात्री दुधासोबतही अंजीरचे सेवन करू शकता. यामुळे हाडे मजबूत होतात आणि झोप सुधारते. याव्यतिरिक्त भूक लागल्यावर अंजीर हेल्दी स्नॅक म्हणून खाल्ले जाऊ शकते. तुम्ही त्यासोबत बदाम, अक्रोड आणि मनुके देखील मिक्स करून खाऊ शकतात.