
मंकी पॉक्स किंवा एमपॉक्स या आजाराचा संशयित रुग्ण भारतात सापडल्याने खळबळ उडाली आहे. या आजारा संदर्भात नुकतेच जागतिक आरोग्य संघटनेने आपात्कालिन स्थिती जाहीर केली होती. त्यामुळे त्यानंतर आठवडाभरात मंकी पॉक्स आजाराचा रुग्ण भारतात सापडला आहे. या आजाराशी साधर्म्य दर्शविणारी लक्षणे या तरुणात आढळली आहेत. तसेच हा रुग्ण आफ्रीकन देशाचा दौरा करुन परतला असल्याने त्याला विलगीकरण करुन ठेवण्यात आले आहे. तसेच या आजाराची चाचणी करण्यासाठी टेस्ट किट्स देखील आता बाजारात येणार आहेत.आयसीएमआरने या किट्सना मंजूरी दिली आहे. काय आहे हा मंकी पॉक्स काय आहेत त्याची लक्षणे पाहूयात…. Mpox ( आधीचे नाव मंकी पॉक्स ) हा आजार मंकी पॉक्स नावाच्या व्हायरसमुळे होतो. हा व्हायरस स्मॉल पॉक्स या आजाराला कारणीभूत असलेल्या (ज्याला आपण देवी म्हणतो ) व्हायरसच्या जात कुळीतलाच आहे. ज्यांना मंकी पॉक्स होतो त्यांच्या शरीरावर चट्टे किंवा पुरळ येतात. एमपॉक्स हा चिकनपॉक्सशी संबंधित...