AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Health : कुत्रा चावल्यानंतर सर्वात पहिलं काय करावं? या बेसिक गोष्टी जाणून घ्या!

Health News : कुत्रा चावल्यानंतर नेमक्या कोणत्या गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे तसेच कोणते उपाय करणे गरजेचे आहे हे आता आपण जाणून घ्या.

Health : कुत्रा चावल्यानंतर सर्वात पहिलं काय करावं? या बेसिक गोष्टी जाणून घ्या!
Harish Malusare
Harish Malusare | Updated on: Oct 16, 2023 | 5:34 PM
Share

मुंबई : काही दिवसांपूर्वीच एका लहान मुलाचा कुत्र्याने चावा घेतल्यामुळे मृत्यू झाल्याची घटना समोर आली होती. या घटनेने सगळीकडे एकच खळबळ उडाली होती. त्यामुळे कुत्रा चावल्यानंतर काय काळजी घेणे गरजेचे आहे हे प्रत्येकाला माहीत असणे गरजेचे आहे. कारण कुत्रा चावल्यानंतर आपल्या शरीरात अनेक वेगवेगळ्या आजार निर्माण होऊ शकतात.

कुत्रा चावल्यानंतर स्वतःचा बचाव करण्यासाठी प्रथमोपचार करणे गरजेचे आहे. तर कुत्रा चावल्यानंतर सर्वात आधी जखम पंधरा मिनिटे स्वच्छ धुवावी त्यानंतर जखमेवर मलमपट्टी बांधावी. या उपचारानंतर तुम्ही तातडीने डॉक्टरांकडे जाऊन योग्य तो उपचार आणि सल्ला घेणे गरजेचे आहे, जेणेकरून तुमचा रेबीज पासून बचाव होईल.

कुत्रा फक्त चावला तरच रेबीज होतो असं नाही तर कुत्र्याने ओरबाडल्यानंतर देखील रेबीज होण्याची शक्यता असते. त्यामुळे जर कुत्रा चावला किंवा ओरबडला तर तातडीने डॉक्टरांकडून योग्य तो उपचार घेणे गरजेचे आहे. तसेच त्यांच्या सूचनेनुसार लसीकरण करणे देखील गरजेचे आहे.

कुत्रा चावल्यानंतर सगळ्यात आधी झालेल्या जखमेवर निर्जंतुक पट्टी बांधणे गरजेचे आहे. झालेल्या जखमेवर मलम पट्टी करावी आणि त्यानंतर डॉक्टरांकडून योग्य तो उपचार घेणे गरजेचे आहे.

कुत्रा चावल्याने आपल्याला रेबीज होऊ शकतो. त्यामुळे कुत्रा चावल्यानंतर तातडीने डॉक्टरांशी संपर्क साधणं गरजेचं आहे. पण आजकाल बहुतेक लोक त्यांच्या पाळीव कुत्र्यांचं लसीकरण करतात त्यामुळे रेबीज होण्याची शक्यता कमी असते. परंतु काही भटक्या कुत्र्यांमध्ये रेबीजची शक्यता असते त्यामुळे कुत्रा चावल्यानंतर आपल्याला रेबीज होऊ शकतो त्यामुळे डॉक्टरांचे योग्य तो सल्ला घेणे गरजेचे आहे.

कुत्रा चावल्यानंतर 24 तासांच्या आत इंजेक्शन घेणे फार गरजेचे असते. त्यामुळे कुत्रा चालल्यानंतर पाच इंजेक्शन घेणे गरजेचे असतं. हे इंजेक्शन पहिल्या दिवशी, दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी आणि त्यानंतर सातव्या दिवशी तसेच चौदाव्या दिवशी आणि शेवटी 28व्या दिवशी दिले जाते.

Follow Us
निवडणूक आयोगाने पक्षचिन्ह दिलं नाही तरी... विलिनीकरणाच्या विषयावर...
निवडणूक आयोगाने पक्षचिन्ह दिलं नाही तरी... विलिनीकरणाच्या विषयावर शरद पवारांचं मोठं विधान
सत्तेत राहण्यापेक्षा विरोधात जास्त... सुप्रिया सुळे भर मंचावरून...
सत्तेत राहण्यापेक्षा विरोधात जास्त... सुप्रिया सुळे भर मंचावरून नेमकं काय म्हणाल्या?
348 तालुके संकटात; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शरद पवारांचा सरकारला इशारा
348 तालुके संकटात; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शरद पवारांचा सरकारला इशारा, नेमकं काय म्हणाले?
अभिजीत दीपकेंवर बड्या नेत्याचा हल्लाबोल; गद्दार आणि दलितविरोधी म्हणत..
अभिजीत दीपकेंवर बड्या नेत्याचा हल्लाबोल; गद्दार आणि दलितविरोधी म्हणत केला गंभीर आरोप
सोलापुरात काँग्रेसचे ज्ञानेश कुमारांविरोधात आंदोलन, प्रणिती शिंदे...
सोलापुरात काँग्रेसचे ज्ञानेश कुमारांविरोधात आंदोलन, प्रणिती शिंदे आक्रमक
पुन्हा महिला आयोगाचं पद चर्चेत, महिला नेत्यानेच केली मोठी मागणी; थेट..
पुन्हा महिला आयोगाचं अध्यक्षपद चर्चेत, महिला नेत्यानेच केली मोठी मागणी; थेट म्हणाल्या, सहा महिने...
यवतमाळच्या शेतकऱ्यांना पीक विमा का नाही? बावनकुळेंनी दिले चौकशीचे...
यवतमाळच्या शेतकऱ्यांना पीक विमा का नाही? बावनकुळेंनी दिले चौकशीचे संकेत
ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचा एल्गार; कार्यकर्ते थेट..
Nagpur : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचा एल्गार; कार्यकर्ते थेट बॅरिकेड्सवर चढले, पुतळा जाळत...
मला एकटं पाडण्याचा अन्....; मनोज जरांगे पाटलांचा गंभीर दावा
Manoj Jarange Patil : मला एकटं पाडण्याचा अन्....; मनोज जरांगे पाटलांचा गंभीर दावा, पुढे म्हणाले...
गोरेगावमधील अवैध झोपड्यांवर BMCची कारवाई; थेट बुलडोझर...
Goregaon : गोरेगावमधील अवैध झोपड्यांवर BMCची कारवाई; थेट बुलडोझर...