वजन कमी करायचेय का, तर हा उपाय अवश्य करा; मखाण्याच्या सेवनाचे विविध फायदे जाणून घ्या

| Updated on: Aug 24, 2021 | 8:29 AM

भारतातील जवळजवळ सर्व भागांमध्ये हे एक लोकप्रिय खाद्य आहे. लोक उपवासादरम्यान स्नॅक म्हणून मखाण्याचे सेवन करतात. मखाणा विशेषत: उत्तर भारतामध्ये अधिक प्रमाणात खाल्ला जातो. लोक अनेक प्रकारे मखाणा खातात.

वजन कमी करायचेय का, तर हा उपाय अवश्य करा; मखाण्याच्या सेवनाचे विविध फायदे जाणून घ्या
वजन कमी करायचेय का, तर हा उपाय अवश्य करा
Follow us on

मुंबई : मखाण्याचे आरोग्याच्या दृष्टीकोनातून बरेच फायदे आहेत. हे फायदे काय आहेत ते तुम्ही एकदा का जाणून घेतले की तुम्हीसुद्धा तुमच्या आहारामध्ये मखाण्यांचा नक्कीच समावेश कराल. सर्वसाधारणपणे मखाण्यांचा खीर किंवा मसालेदार पदार्थांमध्ये वापर केला जातो. तुमची इच्छा असल्यास तुम्ही याचा डाएटमध्येही समावेश करू शकता. कारण मखाण्यामध्ये शरीरास पोषक असणाऱ्या विविध घटकांचा समावेश असतो. मखाण्याला फॉक्सनट असेही म्हणतात. सामान्यत: प्रत्येक भारतीय कुटुंबामध्ये मखाण्याचा आहारात समावेश केला जातो. (Whether you want to lose weight, know the various benefits of eating makhana)

भारतातील जवळजवळ सर्व भागांमध्ये हे एक लोकप्रिय खाद्य आहे. लोक उपवासादरम्यान स्नॅक म्हणून मखाण्याचे सेवन करतात. मखाणा विशेषत: उत्तर भारतामध्ये अधिक प्रमाणात खाल्ला जातो. लोक अनेक प्रकारे मखाणा खातात. काही लोक दुधात किंवा खीरमध्ये मिसळून मखाणा खातात. तसेच तळलेल्या किंवा इतर अनेक प्रकारे मखाण्याचे सेवन केले जाते. लोक मखाणा मोठ्या उत्साहाने खातात. कोरड्या फळांमध्ये मखाण्याला पहिली पसंती दिली जाते. जरी ते स्वस्त नसले तरी लोक चव आणि गुणांमुळे मखाणा आवडीने खातात.

उपवासादरम्यान आवर्जून मखाणा खाल्ले जाते. कारण उपवास करताना खाल्लेले अन्न हे बऱ्याचदा काळजीपूर्वक तयार केले जाते. कारण ते लोकांसाठी उर्जेचा एकमेव स्त्रोत आहे. मखाण्यांचा किती फायदा होतो, वजन कमी करण्यात मखाण्याची कितपत मदत ठरू शकते, तेसुद्धा येथे जाणून घेऊया.

वजन कमी करण्यासाठी उपयुक्त

फॉक्सनट अर्थात मखाणा हे प्रथिने आणि फायबरचे समृद्ध स्त्रोत आहेत. मखाणा आपल्या आहारात निरोगी घटकांची भर घालतात. मखाण्यात असलेली प्रथिने तुम्हाला दीर्घ कालावधीसाठी उपयुक्त ठरतात. ते आपली भूक कमी करण्यास मदत करतात. तसेच त्यामुळे कॅलरीजची संख्या देखील कमी होते. तुम्ही तुमच्या नाश्त्यात किंवा दुपारच्या जेवणामध्ये मखाण्याचा समावेश करू शकता.

मखाण्याचे इतर फायदे

अँटिऑक्सिडंट्स

मखाण्यामध्ये फ्लेव्होनॉइड्ससारख्या अँटीऑक्सिडंट्सचा अंतर्भाव असतो. तसेच त्यात दाहकविरोधी गुणधर्म असू शकतात, जे हृदयाच्या आरोग्यासाठी चांगले असतात. तसेच त्यांच्यामुळे त्वचेच्या आरोग्याला प्रोत्साहन मिळते.

रक्तातील साखरेचे संतुलन राखण्यास मदत

फॉक्सनट्समध्ये कमी ग्लायसेमिक इंडेक्स असतो. अनेक अभ्यासांमधून हे सिद्ध झाले आहे की निरोगी रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी मखाण्याचा चांगला फायदा होतो.

हाडांचे आरोग्य सुस्थितीत ठेवण्यास उपयुक्त

फॉक्सनट्समध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असतात, जे हाडांचे आरोग्य उत्तम राखण्यासाठी आवश्यक असतात. निरोगी हाडे, दात तसेच इतर समस्यांवर मात करण्यासाठी मखाण्याचे नियमित सेवन करायला काहीच हरकत नाही. तसेच ऑस्टियोपोरोसिससारख्या परिस्थितीचे व्यवस्थापन करण्यासाठी आपल्या आहारात फॉक्सनटचा समावेश करा. (Whether you want to lose weight, know the various benefits of eating makhana)

इतर बातम्या

VIDEO | डॉगीने किचनमधून जेवण चोरण्यासाठी लढवली भन्नाट शक्कल; तुम्हीही व्हिडीओ पाहून थक्क व्हाल

Video : मुख्यमंत्र्यांवर बोलताना राणेंची जीभ घसरली! पण स्वातंत्र्य दिनी मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले होते?