Health : दवाखान्यात डॉक्टर जीभ का पाहतात?, तुमच्या जिभेवरील ‘या’ गोष्टीवरून सर्व काही समजतात!

अनेकदा डॉक्टर तुमची जीभ पाहून रोग ओळखतात. यामागे नेमकं काय विज्ञान आहे? तुमच्या जिभेचा रंग सांगते की शरीरात कोणता आजार आहे.

Health : दवाखान्यात डॉक्टर जीभ का पाहतात?, तुमच्या जिभेवरील या गोष्टीवरून सर्व काही समजतात!
| Updated on: Jun 12, 2023 | 11:49 PM

आपल्याला काही आजार झाला तर त्याची सुरूवातीची लक्षणे आपल्या अनेक अवयवांवर आधीच दिसून येतात. जेव्हाही आपण आजारी पडल्यावर डॉक्टरांकडे जातो तेव्हा ते सगळ्यात आधी आपली जीभ तपासतात. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की डॉक्टर आपली जीभ का पाहतात. बहुतेक लोकांना या प्रश्नाचं उत्तर माहिती नसेल. तर आज आपण याबाबत जाणून घेणार आहोत.

1. जीभ पांढरी होणे
जर आपल्या जिभेचा रंग पांढरा असेल किंवा जिभेवर पांढरे डाग दिसले तर हे यीस्ट इन्फेक्शनचे लक्षण असू शकते. तंबाखूचे सेवन करणाऱ्या लोकांची जीभ अनेकदा पांढरी होते. तसंच हलकी पांढरी जीभ होणं हे अशक्तपणाचं लक्षण असू शकतं.

2. जिभेवर काळा डाग येणे
जर जिभेवर काळे डाग आढळल्यास ते बॅक्टेरिया किंवा बुरशीजन्य संसर्गाचे लक्षण असू शकते. लोहाच्या गोळ्याही जास्त प्रमाणात घेतल्यावर जिभेचा रंग काळा पडतो.

3. जीभ लाल होणे
जर शरीरात व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता असेल तर जीभ लाल होते. तसंच काहीवेळा जिभेचा रंग लाल होणं हे संसर्ग आणि तापाचे लक्षण असू शकते. जर असं काही झाल्यास त्वरित डॉक्टरांना भेटावे.

4. केसासारखी गोष्ट चिकटणे
कधी कधी आपल्या जिभेवर केसासारखं काहीतरी अडकल्याचं जाणवतं. ते काळ्या, पांढर्‍या किंवा तपकिरी रंगाचं असू शकतं. जेव्हा जिभेच्या गाठींना प्रोटीन धारीदार बनवतो तेव्हा हे असे होते. यामध्ये बॅक्टेरिया अडकण्याचाही धोका असतो ज्यामुळे आरोग्यास हानी पोहोचू शकते.