AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रात्री झोप लागताच झटका बसतो? जाणून घ्या सविस्तर!

तुम्ही रात्री झोपायला जाता आणि अचानक तुमच्या शरीराला झटका बसतो? वाटतं जणू कुठूनतरी पडतोय! ही घटना नेहमीच का घडते आणि यामागचं कारण काय आहे? चला, जाणून घेऊ

रात्री झोप लागताच झटका बसतो? जाणून घ्या सविस्तर!
SleepImage Credit source: tv9 marathi
साक्षी कणसे
साक्षी कणसे | Edited By: | Updated on: May 03, 2025 | 4:37 PM
Share

कधी असं घडलंय का, की तुम्ही शांतपणे झोपायला गेलात आणि झोप लागतेय तोच क्षणी अचानक शरीरात झटका बसतो? क्षणभर वाटतं जणू आपण पडतोय किंवा कोणी हलवलंय. ही घटना इतकी सामान्य आहे की अनेकांना ती अनुभवास येते, पण त्यामागचं खरं कारण फार कमी लोकांना माहिती असतं.

या विचित्र अनुभवाला वैज्ञानिक भाषेत “हायप्निक जर्क” किंवा “स्लीप स्टार्ट” म्हणतात. ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे, जी शरीर झोपेच्या प्रारंभिक टप्प्यात जाताना अनुभवते. मेंदू आणि शरीर यांच्यातील समन्वय काही क्षणांसाठी विस्कळीत होतो आणि यामुळे शरीराला झटका बसतो.

कधीकधी, दिवसभराच्या थकव्यामुळे, जास्त कॅफिन किंवा स्ट्रेसमुळे मेंदू अधिक सक्रिय असतो. शरीर शांत होत असताना, मेंदूला वाटतं की आपण कोसळत आहोत, आणि मेंदू तात्काळ स्नायूंना हालचाल करण्याचा सिग्नल देतो त्यामुळेच अचानक झटका बसतो.

अनेकदा या झटक्याचं कोणतेही शारीरिक नुकसान होत नाही. मात्र, हे वारंवार होऊ लागल्यास आणि झोपेत अडथळा निर्माण करत असेल, तर डॉक्टरांचा सल्ला घेणं योग्य ठरते. झोपेच्या वेळेचा अचूक दिनक्रम, इलेक्ट्रॉनिक स्क्रिनपासून दूर राहणं आणि हलकी डिनर घेणं या गोष्टी फायदेशीर ठरू शकतात.

शरीर आणि मेंदू दोघंही झोपेच्या वेगळ्या गतीने तयारी करत असतात. हा झटका म्हणजे त्यांच्यातील संवादाचा एक विसंगत क्षण. पण जर हे वारंवार घडू लागलं, तर ही तुम्हाला मिळालेली एक इशारा समजा!

Follow Us
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार