
काही दिवसांपूर्वीच हिना खान हिने सोशल मीडियावर ती ब्रेस्ट कॅन्सरच्या तिसऱ्या टप्प्याशी झुंज देत असल्याची माहिती शेअर केली होती. स्तनाचा कर्करोग होण्याचं प्रमाण सध्या वाढत आहे. संशोधक, तज्ञ आणि स्तनाचा कर्करोगावर मात केलेल्या सेलिब्रिटींचा असा विश्वास आहे की या धोकादायक आजारावरही मात केली जाऊ शकते. या आजाराशी पीडित व्यक्तीने जर तिच्या आजारावर लाज, संकोच आणि भीतीच्या पलीकडे जाऊन नियमित उपचार घेतले तर कोणीही या आजारावर नक्कीच मात करु शकतात. स्त्रिया याला सामाजिक कलंक मानतात आणि उपचार घेण्यात विलंब करतात. पण असे करु नये. सुप्रसिद्ध अभिनेत्री हिना खानने सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर करत ती या कर्करोगाच्या तिसऱ्या टप्प्यातून जात असल्याचं सांगितलं. तेव्हा इंडस्ट्री आणि तिच्या चाहत्यांमध्ये भीती आणि चिंतेची लाट पसरली. यामुळे चाहत्यांना आणि इंडस्ट्रीला चिंता वाटणे स्वाभाविक आहे. कारण देशात कर्करोगाने होणाऱ्या महिलांच्या मृत्यूची आकडेवारी भीतीदायक आहे. ताहिराने केली ब्रेस्ट...