गुगलवर 11,760 कोटीचा दंड

बेल्जिअम : युरोपियन संघाच्या (ईयू) प्रतिस्पर्धा आयोगाने गुगलवर अयोग्य व्यवहाराप्रकरणी 1.49 अरब युरो म्हणजेच जवळपास 11,760 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. हा दंड ऑनलाईन जाहिरातीत आपल्या पदाचा दुरुपयोग केल्याप्रकरणी ठोठावण्यात आला आहे. प्रतिस्पर्धा नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी तिसऱ्यांदा गुगलकडून दंड आकारण्यात येत आहे. युरोपियन संघाच्या प्रतिस्पर्धा आयुक्त मारग्रेट वेस्टॅगर यांनी ब्रेसेल्स येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी …

penalty on Google, गुगलवर 11,760 कोटीचा दंड

बेल्जिअम : युरोपियन संघाच्या (ईयू) प्रतिस्पर्धा आयोगाने गुगलवर अयोग्य व्यवहाराप्रकरणी 1.49 अरब युरो म्हणजेच जवळपास 11,760 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. हा दंड ऑनलाईन जाहिरातीत आपल्या पदाचा दुरुपयोग केल्याप्रकरणी ठोठावण्यात आला आहे. प्रतिस्पर्धा नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी तिसऱ्यांदा गुगलकडून दंड आकारण्यात येत आहे.

युरोपियन संघाच्या प्रतिस्पर्धा आयुक्त मारग्रेट वेस्टॅगर यांनी ब्रेसेल्स येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी ही माहिती दिली. गुगलच्या अॅडसेन्स जाहिरात व्यवसायप्रकरणी बऱ्याच काळापासून सुरु असलेल्या चौकशीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

या चौकशीत गुगलने अॅडसेन्स प्लॅटफॉर्मवर जाहिरातींसाठी ब्रोकर्सचा उपयोग करत असलेल्या वेबसाईट्सना थांबवण्यासाठी आपल्या स्थानाचा दुरुपयोग केल्याचं समोर आलं आहे. गुगल आणि गुगलची मूळ कंपनी अल्फाबेटने ईयू प्रतिस्पर्धेच्या नियमांचं उल्लंघन केलं आहे. गुगलने अॅडसेन्सचा वापर करणाऱ्या वेबसाईट्ससोबत करार करत प्रतिबंधात्मक तरतुदींचा वापर केला. त्यामुळे गुगलच्या प्रतिस्पर्धी कंपन्या आपल्या जाहिराती या वेबसाईटवर देण्यात असमर्थ होत्या.

2009 मध्ये मायक्रोसॉफ्टने ईयू प्रतिस्पर्धा आयोगाकडे याची तक्रार दाखल केली होती. 2016 साली आयोगाने याचा तपास सुरु केला. गेल्यावर्षी गुगलवर 430 कोटी रुपये आणि 2017 मध्ये 270 कोटी रुपयांचा दंड ठोठावला होता.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *