ऐन नवरात्रीत हिंदूंच्या जीवावर कोण उठलंय? हल्लेखोर शेकडो भक्तांवर झाडणार होता 300 गोळ्या, काय आहे संपूर्ण प्रकरण?
अमेरिकेतून धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. एक तरुण हिंदू मंदिरातील भक्तावर गोळीबार करणार होता, असल्याची माहिती समोर आली आहे.

अमेरिकेतून हादरवणारी घटना समोर आली आहे. अमेरिकेतील हिंदू मंदिरात भक्तांवर बंदुकधारीचा व्यक्तीचा गोळीबार करण्याचा डाव होता. तो एआर-स्टाइल आणि 300 राऊंड गोळ्या झाडणार होता. या गोळीबारात अनेक हिंदूंचा मृत्यू होण्याची शक्यता होती. परंतु ऐनवेळी हल्लेखोराचा खेळ बिघडला. त्यामुळे शेकडो हिंदूंचा जीव वाचला. नेमकं काय घडलं जाणून घ्या.
इलिनोइसच्या ऑरोरा भगात हिंदूंच्या मंदिरावर हल्ला करण्याचा डाव आखण्यात आला होता. पोलिसांनी या प्रकरणी 19 वर्षीय तरुणाला अटक केली आहे. हा तरुण पॅलेटाइनचा राहणारा आहे. एलेक्जेंड्रॉस पॅपोराकिस असे या तरुणाचे नाव आहे. त्याने एकाचवेळी शेकडो लोकांवर गोळीबार करण्याचा डाव आखला होता. एलेक्जेड्रॉस हा शस्त्र घेऊन पोहोचला. त्याने गोळीबार करण्याचा प्रयत्न सुरू केला. परंतु त्याच्या बंदुकीत अचानक बिघाड झाला. 19 वर्षीय आरोपी हा फास्ट-फूड रेस्टॉरंटमध्ये कॅसियर म्हणून काम करतो. उत्तर पश्चिमच्या पॅलटाइनच्या पोलिसांच्या माहितीनुसार, पॅपोराकिसने ऑरोराच्या एका हिंदू मंदिरात भारतीय लोकांची हत्या करण्याचा डाव आखला होता. त्याने रविवारी सर्व भक्तांवर हल्ला करण्याचा डाव आखला होता. 19 वर्षीय मुलगा मंदिरात पोहोचल्यानंतर बंदूक बिघडली. त्यामुळे त्याला लोकांवर हल्ला करता आला नाही.
नेमकं काय घडलं?
आरोपीने एकाच वेळी सर्व भक्तांवर गोळीबाराचा डाव आखला होता. ऑरोरा येथे हिंदूंचं सर्वात मोठं मंदिर आहे. या मंदिरात 11 ऑक्टोबर रोजी भक्तांची एकच गर्दी झाली होती. यामुळे आरोपीने भारतीयांवर गोळीबाराचा प्लान रचला होता. परंतु पॅपोराकिसची बंदूक बिघडल्याने कोणतीही विपरिती घटना घडली नाही. आरोपी हा 300 गोळ्या झाडणार होता. त्याच्याजवळ बॉडी आर्मर, पेट्रोलचा कॅन होता.
पॅलाटाइनने आईची गाडी घेऊन ऑरोरा मंदिर परिसरात पोहोचला होता. त्याने मंदिरात गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. परंतु बंदूक बिघडली. त्यामुळे पुन्हा घरी परतला. त्याने घटनास्थळी बिघडलेली बंदूक कशी दुरुस्त करायची, याविषयी गुगलवर सर्च केलं होतं. त्याने त्याच्या मित्राला देखील गोळीबाराचा प्लान आखल्याचे सांगितले होते. या घटनेनंतर हिंदू अमेरिकन फाऊंडेशनने चिंता व्यक्त केली आहे. या तरुणाला पोलिसांनी अटक केल्याची माहिती मिळतेय.