
पंतप्रधान मोदी तीन दिवसीय युरोप दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यातील पहिल्या टप्प्यात त्यांनी जर्मनीला भेट दिली. यावेळी तेथील भारतीय लोकांच्यासोबत संवाद साधला.नव्या उदयमान भारताने संकल्पासह पुढे जाण्याचा निर्धार केला आहे. याच बरोबर जगभरातील भारतीयांनी भारताला जागतिक स्तरावर प्रगती करण्यासाठी मदतीचा हात द्यावा असे आवाहनही त्यांनी केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ऐकण्यासाठी मोठी गर्दी जमा झाली होती. यावेळी ते म्हणाले युवा व महत्त्वाकांक्षी भारताने वेगाने प्रगती करण्यासाठी राजकीय स्थिरता असणे आवश्यक असल्याचे समजून घेतले. एवढंच नव्हे तर आपल्या मतपेटीतून गेल्या तीन दशकापासून असलेली अस्थिरता संपवली.

21शतकातील ही वेळ भारतासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. आता भारताने ठरवले आहे. संकल्पासह पुढे जाण्याचा निर्णय घेतला आहे . जेव्हा - जेव्हा देश नवीन संकल्प करतो तेव्हा नवनवीन मार्गावरचालत ध्येयपूर्ती केली जाते.

जर्मनीमधील थिएटर एम पोस्टडमर प्लात्ज मध्ये मोदीनी लोकांना संबोधीत केले यावेळी मोदी है तो मुमकीन है. २०२४ मोदी वन्स मोअर च्या घोषणा देताना आल्या.

जर्मनी दौऱ्यात पंतप्रधान मोदींची एक वेगळी शैली पाहायला मिळाली. येथे त्यांच्या स्वागतासाठी ढोल-ताशे वाजवले जात होते. यावेळी पंतप्रधान मोदीही लोकांमध्ये गेले. परदेशातील भारतीयांमध्ये पंतप्रधान मोदींबाबत मोठी क्रेझ दिसून आली. बहुतेक भारतीय त्याच्यासोबत सेल्फीही घेतले.

जर्मनीमध्ये मोदीना ऐकण्यासाठी जर्मनीतील जवळपास 1600 हून अधिक भारतीय ऐकण्यासाठी सहभागी झाले होते. यामध्ये विद्यार्थी, संशोधक , अभ्यासक ही उपस्थित होते.