
Ghana Eboh Noah Predictions: घाना या देशातील व्यक्तीने स्वतःला देवाचा दूत जाहीर केले आहे. त्याने स्वतःला नोआ म्हणून घोषित केले आहे. बायबलमधील नोआच्या कथेशी स्वतःला जोडत त्याने एक ऑर्क ऑफ नूह म्हणजे एक मोठे जहाजही बांधले आहे. त्याच्या दाव्यानुसार, 25 डिसेंबर, ख्रिसमसच्या दिवशी महापूर येणार आहे. मुसळधार पावसामुळे हा महापूर येईल.या संकटातून वाचण्यासाठी लोक त्याच्या नावेत शरण येऊ शकतात असा दावा त्याने केला आहे. त्याचा दावा खरा मानून घाना देशातील लाखो लोकांची भीतीने गाळण उडाली आहे. हे लोक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरून त्यांनी त्या नावेकडे धाव घेतली आहे. सोशल मीडियावर या भयावह गर्दीचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. लोकांना एबोच्या जहाजात प्रवेश करायचा आहे, त्यासाठी लांबच लांब रांगा लागल्या आहेत.
25 डिसेंबर रोजीपासून महासंकट
एबो नाओ या व्यक्तीने सोशल मीडियावर एक भाकीत वर्तवले होते. त्यानुसार, 25 डिसेंबर रोजी मुसळधार पावसाचा कहर होईल आणि महापूर येईल. या महापूरातून वाचण्यासाठी आपण एक मोठी नाव, जहाज तयार करत असल्याचे एबो नाओ ही व्यक्ती दावा करते. या जहाजात येण्याचे सर्वांना आग्रहाने निमंत्रणही धाडते. घानामधील काही वृत्तानुसार, एबो नाओ याला देवाने असे संकेत दिल्याचा त्याचा दावा आहे. त्यानुसार 25 डिसेंबर रोजी ख्रिसमसच्या दिवशीच जग संपणार आहे. देवानेच या संकटाची त्याला चाहुल दिली आणि त्यामुळे त्याने हे विशाल जहाज तयार केले आहे.
There’s Problems oo. A big problem.
Happening live in 𝐺𝐻𝐴𝑁𝐴🇬🇭 .
Ghanians are hurrying to secure spots in one of the 8 arks built by Prophet Eboh Noah, who claims God revealed that the world will end tomorrow, December 25th, by flooding, and only those in his ark will be… https://t.co/dfz87EVRRq pic.twitter.com/RnC1rwaGLJ
— Ozor Ndi Ozor (@OzorNdiOzor) December 24, 2025
या संकटापासून वाचण्यासाठी एबो नाओने एक नाही तर दहा जहाजांचा ताफा तयार केला आहे. त्याच्या दाव्यानुसार, आज, 25 डिसेंबरपासून मुसळधार पावसाला सुरुवात होईल. अशावेळी हे जहाज त्याला आणि त्याच्या अनुयायांना वाचवेल. स्वतःला नोआ म्हणवणारी ही व्यक्ती 30 वर्षांची आहे. तो स्वतःला एबो जीसस अथवा एबो नोआ असे म्हणतो. द सन च्या वृत्तानुसार, जेव्हा त्याने त्याच्या अनुयायांसाठी काय होणार आणि कसे होणार हा व्हिडिओ युट्यूबवर अपलोड केला होता.
त्याच्या दाव्यानुसार 25 डिसेंबर 2025 रोजीपासून जगभरात मुसळधार पावसाला सुरुवात होईल. पुढील तीन वर्षे सारखा पाऊस पडत राहिल. या काळात तो आणि त्याचे अनुयायी हे या नावांच्या ताफ्यात असतील. पण या होड्या किती तग धरतील असा सवाल त्याच्या व्हिडिओ पाहून वर्तवण्यात येत आहे. एबो आणि त्याचे सहकारी अशा होड्या तयार करताना दिसत आहेत. त्याची अनेकांनी खिल्ली सुद्धा उडवली आहे. त्याची ही भविष्यवाणी बावळटपणा असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. अनेकांनी त्याच्या अनुयायांवर सुद्धा टीका केली आहे.