
युक्रेनच्या सुमीमध्ये देखील भारताचे काही विद्यार्थी अडकले आहेत. या विद्यार्थ्यांना सुमीमधून बाहेर काढण्यात येत आहे. सुमीमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना घेऊन बारा बसचा ताफा पोलंडच्या दिशेने आज रवाना झाला आहे.

या बसमध्ये केवळ भारतीयच विद्यार्थीच नाहीत तर यामध्ये नेपाळी आणि पाकिस्तानी विद्यार्थ्यांचा देखील समावेश आहे. भारत सरकार पाकिस्तानी आणि नेपाळी विद्यार्थ्यांना देखील युक्रेनमधून सुरक्षीत बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करत आहे.

एकूण बारा बसच्या मदतीने या विद्यार्थ्यांना युक्रेनच्या सुमी शहरातून बाहेर काढण्यात आले आहे. सुरक्षीत बाहेर काढल्याबद्दल नेपाळी आणि पाकिस्तानी विद्यार्थ्य्यांनी भारत सरकारचे आभार मानले आहेत.

याचदरम्यान पराष्ट्र मंत्रालयाने ट्विट करत हे विद्यार्थी सुखरूप असल्याची माहिती दिली आहे. आम्हाला आनंद होत आहे की, आम्ही युक्रेनच्या सुमीमधून सर्व विद्यार्थ्यांचे स्थलांतर केले असून, सर्व विद्यार्थी सुरक्षीत असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.

युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना देशात आणण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने ऑपरेशन गंगा नावाची मोहीम राबावण्यात आली आहे. या मोहीमेंतर्गंत आतापर्यंत हजारो विद्यार्थ्यांना भारतात आणण्यात आले आहे. काही विद्यार्थी युक्रेनच्या सुमी शहरात अडकले होते. बारा बसच्या मदतीने त्यांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात आले आहे.