Girl bite: दोन वर्षांच्या मुलीने घेतला सापाचा चावा, एवढ्या जोरात चावली की सापाचे झाले दोन तुकडे

ही घटना तुर्कीतल्या एका गावात घडली आहे. द सनने दिलेल्या वृत्तानुसार, ही मुलगी अवघ्या दोन वर्षांची होती आणि ती घरातील एका खोलीत खेळत होती. त्याचवेळी साप त्या खोलीत पोहचला. सापाला खेळणं समजून ती लहानगी त्या सापाशीच खेळू लागली.

Girl bite: दोन वर्षांच्या मुलीने घेतला सापाचा चावा, एवढ्या जोरात चावली की सापाचे झाले दोन तुकडे
दंश केला म्हणून चिडलेला मुलगा सापालाच चावला
Image Credit source: social media
| Edited By: | Updated on: Aug 15, 2022 | 4:12 PM

नवी दिल्ली – सापाने माणसांना चावल्याच्या घटना तुम्ही अनेकदा ऐकल्या आसालच. अनेकदा तर घरात बेडरुम किंवा बाथरुममध्ये अनपेक्षितपणे साप दिसणे आणि चावल्याच्या घटना घडलेल्या आपण ऐकतो, पाहतो. साप चावल्याने एखाद्याचा मृत्यू झाल्याचे ऐकून सगळेच जण हळहळतात. मात्र यातली एक वेगळी घटना तुर्कीमध्ये (Turkey)घडली आहे. ही घटना थोडी धक्कादायकही आहे. तुर्कीत एका दोन वर्षांच्या मुलीला (Two years girl)सापाने चावा घेतलानंतर, रागावलेल्या या दोन वर्षांच्या मुलीनेही सापाचा चावा (snake)घेतला. तिचा त्या सापाचा इतका राग आला होता की तिने सापाला उचलले आपल्या दाताखाली धरले आणि त्याला ती इतक्या जोरात चावली की तिथेच त्या सापाचे दोन तुकडे झाले.

नेमका काय घडला प्रकार

ही घटना तुर्कीतल्या एका गावात घडली आहे. द सनने दिलेल्या वृत्तानुसार, ही मुलगी अवघ्या दोन वर्षांची होती आणि ती घरातील एका खोलीत खेळत होती. त्याचवेळी साप त्या खोलीत पोहचला. सापाला खेळणं समजून ती लहानगी त्या सापाशीच खेळू लागली. सापाशी ती खेळत असतानाच सापाने तिच्या ओठांवर चावा घेतला. सापाने तिला चावल्यानंतर, या दोन वर्षांच्या मुलीला राग आला. तिनेही लगेच दातानेच या सापाला चावले.

सापाचा त्याच ठिकाणी मृत्यू

धक्कादायक बाब म्हणजे या मुलीचा साप चावल्याने इतका संताप झआला होता की तिने सापाचा जोरदार चावा घेतला. त्यामुळे सापाचे दोन तुकडेच झाले, साप तिने चावल्याने तिथेच मेला. सापाचा चावा घेतल्यानंतर तिच्या चेहऱ्यावर सापाचं रक्त पसरलं होतं. त्यानंतर मुलगी जोरजोरात रडू लागली. तिच्या रडण्याचा आवाज ऐकून घरातले आणि शेजारचे जेव्हा तिच्या खोलीत पोहचले, तेव्हा घडलेला प्रकार पाहून तिथे एकच गोँधळ उडाला.

लहानगीला तातडीने नेले हॉस्पिटलमध्ये

तिथे आलेल्यांनी हा प्रकार पाहिला आणि ते हतबुद्धच झाले. त्यांनी तातडीने या दोन वर्षांच्या मुलीला जवळ हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मिळालेल्या माहितीनुसार, या लहानगीला एक दिवस निरिक्षणाखाली ठेवण्यात आले होते. सध्या ही मुलगी धोक्यातून बाहेर आली असून, तिची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे. तीला चावलेला साप हा कमी विषारी असल्याने या लहानगीला सुदैवाने काही झाले नाही. जर साप विषारी असतातर मुलीच्या जीवाला धोका होऊ शकला असता. घडलेल्या या प्रकाराने तिचे आई वडील दोघांनाही मोठा धक्का बसलेला आहे. मुलांकडे किती लक्ष देण्याची गरज आहे, याची चांगलीच अद्दल त्यांना यानिमित्ताने घडली आहे.