भारतामधील ही गोष्ट पुतिन यांना खूपच आवडली, कौतुक करताना थकत नाहीयेत, म्हणाले असं मी जगात कुठेच पाहिलं नाही
रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन हे दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर होते, पण त्यांना भारतामधील एक गोष्ट इतकी आवडली की ते त्या गोष्टीच्या प्रेमातच पडले आहेत, म्हणाले ती गोष्ट मी कधीच विसरू शकणार नाही.

रशियाचे राष्ट्रपती व्लादीमीर पुतिन हे दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर होते. मात्र एवढ्या कमी वेळेत देखील त्यांनी भारताची अशी एक खास गोष्ट नोटीस केली, ज्यासाठी आपला देश प्रसिद्ध आहे. भारत दौऱ्यावरून गेल्यानंतर पाच दिवसांनी पुन्हा एकदा पुतिन यांनी त्या गोष्टीची आठवण काढली, मी ही गोष्ट कधीच विसरू शकणार नाही असं त्यांनी म्हटलं आहे. बुधवारी आपल्या भारत दौऱ्याबद्दल बोलताना पुतिन यांनी म्हटलं की, भारतामधील एक गोष्ट मला सर्वात जास्त आवडली, मी माझ्या आयुष्यात ती गोष्ट विसरू शकणार नाही. ती गोष्ट म्हणजे भारतामध्ये असलेली विविधतेतील एकता असल्याचं पुतिन यांनी म्हटलं आहे. पुतिन यांनी भारताच्या विविधतेमधील एकतेचं कौतुक केलं आहे.
पुतिन यांनी आपल्या भारत दौऱ्याबद्दल बोलताना म्हटलं आहे की, भारतीय संस्कृती जीवंत आहे, आणि येथील लोक खूपच उत्सही आहेत, मजबूत आहेत. भारताची सर्वात मोठी ताकद जर कोणती असेल तर ती म्हणजे तिथे असलेली विविधतेमधील एकता असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. भारतामध्ये सर्वच लोक सारखे नाहीत, प्रत्येकाचे धर्म वेगवेगळे आहेत, भाषा वेगवेगळ्या आहेत, मात्र ते सर्व एक आहेत, संघटीत आहेत, असं यावेळी पुतीन यांनी म्हटलं आहे.
पुतिन कोणती गोष्ट विसरू शकत नाहीत?
पुतिन म्हणाले मी काही दिवसांपूर्वीच भारताच्या दौऱ्यावर होतो. भारतामध्ये जवळपास 1.5 अब्ज लोक राहतात, ते सर्वच जण हिंदी बोलत नाही, त्यातील अंदाजे 50–60 कोटी लोक हिंदी बोलतात, बाकीचे सर्व लोक वेगवेगळ्या भाषा बोलतात. अनेकदा असं देखील होतं, की तिथे अनेकांना एकमेकांची भाषाच येत नसते. मात्र तरी ते लोक संघटीत आहेत, हीच विविधतेमधील एकता भारताला जगातील एक महान आणि समृद्ध देश बनवते असं पुतिन यांनी आपल्या भारता दौऱ्यावर बोलताना रशियामध्ये म्हटलं आहे. दरम्यान पुतिन भारत दौऱ्यावर असातना भारत आणि रशियामध्ये अनेक महत्त्वाचे करार झाले आहेत. ज्याचा भविष्यात दोन्ही देशांना मोठा फयदा होण्याची शक्यता आहे.
