
पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये युद्ध सुर झाले आहे. दोन्ही देशांकडून एकमेकांवर हल्ले केले जात आहे. तालिबानच्या हल्लात 55 पाकिस्तानी सैनिकांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर आता अफगाणिस्तानने पाकिस्तानी शहरांवरही हल्ले करण्यास सुरूवात केली आहे. अफगाणिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाने सांगितले की, आमच्या हवाई दलाने आज सकाळी 11 वाजता पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये हवाई हल्ला केला. दिवसाढवळ्या झालेल्या या हल्ल्यामुळे पाकिस्तानी सैन्याची झोप उडाली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
समोर आलेल्या माहितीनुसार, अफगाणिस्तानच्या हवाई दलाने पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमधील फैजाबाद शहराजवळील एका लष्करी छावणीवर हल्ला केला. त्याचबरोबर तालिबानने खैबर पख्तूनख्वा येथील नौशेरा येथील लष्करी बॅरेक आणि जमरुदमधील एका लष्करी तळावरही हल्ला केला. तसेच अफगाणिस्तानच्या हवाई दलाने अबोटाबादमध्येही हल्ले केले. या हल्ल्यांमध्ये पाकिस्तानचे मोठे नुकसान झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राजधानी इस्लामाबादसह फैजाबाद, नौशेरा कॅन्ट, जमरुद मिलिटरी कॉलनी आणि अबोटाबादजवळील लष्करी छावणीवर सकाळी 11 वाजता हल्ला करण्यात आला. या कारवाईत लष्करी तळ, कमांड सेंटर आणि मोक्याच्या ठिकाणांना लक्ष्य करण्यात आल्याची माहिती अफगाणिस्तानकडून देण्यात आलेली आहे. तत्पूर्वी काल रात्री पाकिस्तानने काबुल, कंधार आणि पक्तिया येथे हवाई हल्ले केले होते. त्याला प्रत्युत्तर म्हणून हे हल्ले करण्यात आले आहेत.
तालिबानने केलेल्या या हल्ल्यात ड्रोनचा वापरही करण्यात आला आहे. या हल्ल्यानंतर पाकिस्तान सरकारकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. तालिबानच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या लष्करी तळांवर आग लागल्याचेही समोर आले आहे. या हल्ल्यानंतर अफगाणिस्तानने ही कारवाई देशाचे रक्षण करण्यासाठी करण्यात आली असल्याची माहिती दिली आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, दंगम जिल्ह्यातील बांशी भागात जोरदार चकमक सुरू आहे. पाकिस्तानी मिलिशिया तेथून माघार घेत आहेत. अफगाणिस्तानने नवपास चौकी ताब्यात घेतली आहे. या ठिकाणी दोन पाकिस्तानी सैनिकांचे मृतदेह आहेत. आणखी काही कारवायांमध्ये आणखी एका वृत्तानुसार, मुजाहिदीनने ताब्यात घेतलेल्या नवपास येथील चौकीवर दोन पाकिस्तानी सैनिकांचे मृतदेह आहेत. आणखी काही कारवायांमध्ये अफगानी सैनिकांनी ड्युरंड रेषेवरील अनेक पाकिस्तानी चौक्या ताब्यात घेतल्या असून मोठ्या प्रमाणात शस्त्रे हस्तगत केली आहेत. अनेक पाकिस्तानी सैनिकांना जिवंत पकडल्याचीही माहिती समोर आली आहे.