भारत ज्या घोषणेच्या प्रतिक्षेत ती घोषणा झालीच, अफगाणिस्तानला मोठे यश, थेट उत्पादनाला सुरूवात..

इराण आणि अमेरिका युद्धात भारतासाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. ज्यामुळे भारताचे तेलाचे संकट दूर होऊ शकते. भारताच्या मित्र देशाला मोठे यश मिळाले. ज्याने तो देशही मालामाल होईल आणि भारताचाही फायदा होईल.

भारत ज्या घोषणेच्या प्रतिक्षेत ती घोषणा झालीच, अफगाणिस्तानला मोठे यश, थेट उत्पादनाला सुरूवात..
Afghanistan
| Updated on: Apr 29, 2026 | 9:41 AM

मध्य पूर्वेतील तणावामुळे तेलाचे जागतिक संकट निर्माण झाले. होर्मुज खाडी बंद आहे. शिवाय काही तेल रिफायनरीवरही युद्धात हल्ले झाले. जागतिक संकट आहे. यादरम्यानच एक अत्यंत आनंदाची बातमी पुढे येत आहे. या जागतिक संकटात अफगाणिस्तानच्या हाती मोठा तेल साठा लागला आहे. अफगाणिस्तानमधून आलेल्या या बातमीमुळे तेल टंचाईत दिलासा मिळाला आहे. अफगाणिस्तानच्या खाण आणि पेट्रोलियम मंत्रालयाने एक निवेदन जारी केले. या निवेदनात त्यांनी म्हटले की, त्यांनी उत्तरेकडील जवझान प्रांतातील आमू दर्या तेल खोऱ्यातील जमराद साई भागातील पाच विहिरींमधून तेल काढण्यास सुरुवात केली आहे. दररोज सध्या या विहिरींमधून 500 घनमीटर तेलाचे उत्पादन होत आहे. सहा महिन्यातच जमरद साई परिसरातील 400 किलोमीटरच्या पट्ट्यात नवीन भूकंपात्मक सर्वेक्षणे करण्यात आले. त्यात आणखी तेल आणि वायू साठे सापडली आहेत.

जर अफगाणिस्तान आपल्या स्रोतांमधून तेल काढण्यात आणि नंतर त्याची निर्यात करण्यात यशस्वी झाला तर याचा सर्वात जास्त थेट फायदा भारताला होणार आहे. त्यांनी उत्पादनही सुरू केले. भारत ऊर्जेकरिता इतर देशांवर अवलंबून आहे. रशिया, कतार, युएई, आफ्रिका अशा देशांकडून भारत तेलाची आयात करतो. भारतात ऊर्जेची मोठी मागणी आहे. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील संबंध कायमच चांगले राहिले आहेत.

पाकिस्तानने अफगाणिस्तानवर केलेल्या मोठ्या हल्ल्यानंतर भारताने अफगाणिस्तानला मदत पाठवली होती. अफगाणिस्तानचे संरक्षण मंत्रीही काही महिन्यांपूर्वीच भारत दाैऱ्यावर आले होते. तालिबान सरकारची स्थिती अत्यंत बिकड आहे. जर त्यांच्या तेलाचे उत्पादन वाढले तर थेट त्यांच्या अर्थव्यवस्था मोठा दिलासा मिळू शकतो.

जर तालिबानने तेलाची निर्यात सुरू केली तर भारत हा त्यांच्या पहिली खरेदीदार ठरू शकतो. अफगाणिस्तानमधून तेल कमी पैशात आणि कमी वेळात भारतात दाखल होऊ शकते. 2023 मध्ये अफगाणिस्तानमधील तालिबान सरकारने आमू दर्या खोऱ्यातून तेल काढण्यासाठी उत्तरेकडील सर ए पुल प्रांतात तेलसाठा विकसित करण्यासाठी एका चिनी कंपनीसोबत करार केला आहे.

Follow Us