
पंजशीरमध्ये नॉर्दर्न अलायन्स आणि तालिबान्यांमध्ये घनघोर लढाईदरम्यान तालिबानने सगळ्या पंजशीरवर ताबा मिळाला असल्याचं वृत्त येत आहे. तालिबानच्या विरुद्ध विद्रोहाचा आवाज बुलंद करणाऱ्या अहमद मसूद यांनी तालिबानसोबत से बातचीत करण्याची तयारी दर्शवली आहे. याचवरुन हे स्पष्ट होतंय की डरकाळ्या फोडणारे अहमद मसूद आता बॅकफुटला आले आहेत. सोमवारी म्हणजे आजच्या दिवशी अहमद मसूद तालिबानसमोर घुडघे टेकण्याची शक्यता वर्तविण्यात येतीय. रविवारी दिवसभर तालिबानी आणि नॉर्दर्न अलायन्स यांच्यादरम्यान घरघोर लढाई सुरु होती.
तालिबानने पंजशीरचा बहुतेक भाग ताब्यात घेतल्याचा दावा केला आहे. रविवारचा दिवस तालिबानसाठी गाजवला. टीव्ही 9 भारतवर्षाशी केलेल्या संभाषणात तालिबानचे प्रवक्ते सुहेल शाहीन यांनी दावा केला आहे की, पंजशीरचे सर्व जिल्हे तालिबानच्या ताब्यात गेले आहेत. दाव्यानुसार तालिबानने पंजशीर प्रांताचाही ताबा घेतला आहे. तालिबानच्या म्हणण्यानुसार, पंजाशिरचे पोलीस मुख्यालय आणि सर्व सुविधा तालिबान्यांनी ताब्यात घेतल्या आहेत.
रविवारी दुपारी विमानतळावर तालिबान्यांनी कब्जा केल्याचा व्हिडिओ समोर आला, पण तिथे भीषण लढाई सुरु असल्याचा दावा पंजशीरचे नेते करत आहेत. तालिबान अजूनही पंजशीरपासून दूर आहे. दुसरीकडे, तालिबानने असा दावा केला आहे की आता पंजाशीरची राजधानी बझारक देखील तालिबानच्या ताब्यात आली आहे.
तालिबानचा मुकाबला करण्यासाठी पंजशीरच्या नेत्यांनी आपली रणनीती बदलली आहे. प्रतिरोध शक्तीने पंजशीरला जोडणारे सर्व पूल उडवले आहेत. जेथे लढाई होऊ शकते अशा भागांचा ताबा पंजशीरमध्ये आहे. विशेष टास्क फोर्सची स्थापना आणि शस्त्रास्त्रांसाठी ताजाकिस्तानकडून पुरवठा देखील मागविण्यात आला आहे.
अमेरिकेने अफगाणिस्तानच्या सद्यस्थितीबद्दल इशारा दिला आहे. अमेरिकेचे लष्कर जनरल मार्क मिल्ली यांनी अफगाणिस्तानची परिस्थिती आणि पंजशीरच्या समीकरणाबाबत जगाला इशारा दिला आहे. जनरल मार्क मिल्ली यांनी इशारा देताना म्हटलंय की, अफगाणिस्तानमध्ये जे वातावरण निर्माण केले जात आहे, ते गृहयुद्ध होऊ शकते. दहशतवादी संघटना पुन्हा अफगाणिस्तानमध्ये एकत्र होऊ शकतात. जर परिस्थिती अशीच राहिली तर अफगाणिस्तानमध्ये अल कायदा, इसिस खोरासन आणि इतर दहशतवादी संघटना अधिक मजबूत होऊ शकतात.
पंजशीरमध्ये तालिबानने किती घट्ट ताबा मिळवलाय, याबाबत नवनवे दावे केले जात आहेत. परंतु चित्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. तालिबान आणि रेझिस्टन्स फोर्स व्हिडिओ जारी करून सतत त्यांच्या वर्चस्वाचा दावा करत आहेत. तालिबानला सर्वात जास्त त्रास पंजशीरच्या युद्धात होत आहे आणि त्याचे सैनिक गुडघे टेकत आहेत, असंही सांगितले जात आहे. एक किंवा दोन नव्हे तर 700 तालिबानी मारल्याचा दावा प्रतिस्पर्ध्यांनी केला आहे.
अफगाणिस्तानमध्ये तालिबान सरकारची स्थापना पंजशीरच्या लढाईमुळे अडकली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अफगाणिस्तानमध्ये नवीन सरकारची घोषणा पंजशीरचा ताबा घेतल्यानंतरच होईल. तालिबानने दुसऱ्यांदा नवीन सरकारची निर्मिती थांबवली आहे. यापूर्वी शुक्रवारच्या नमाजानंतर नवीन सरकारची घोषणा होणार होती. आता नवीन सरकार आणि कॅबिनेट सदस्यांची घोषणा पुढील आठवड्यात होऊ शकते.
(Afganisthan News taliban Cleimed Posseession of Entire Panjashir)
हे ही वाचा :
अफगाणिस्तानमध्ये सत्तेवरुन तालिबान आणि हक्कानी नेटवर्क भिडले, गोळीबारात मुल्ला बरादर जखमी