Afghanistan Crises: मुर्खांचं नंदनवन, पंजशीरमध्ये युद्ध पेटलं, तालिबानी खूश, गोळीबारात लहान मुलांसह 17 जणांचा मृत्यू

गेल्या आठवडाभर पंजशीरमध्ये कशी लढाई सुरु आहे याचे वेगवेगळे वृत्त येतायत. एका रिपोर्टनुसार आठवड्याच्या सुरुवातीलाच तालिबानचे 350 अतिरेकी मारले गेले. 40 जणांना पकडल्याचाही दावा केलाय. हे सगळं खावकच्या लढाईत घडलंय. त्यामुळेच तालिबान्यांसाठी पंजशीरची लढाई वाटते तेवढी सोप्पी नाहीय.

Afghanistan Crises: मुर्खांचं नंदनवन, पंजशीरमध्ये युद्ध पेटलं, तालिबानी खूश, गोळीबारात लहान मुलांसह 17 जणांचा मृत्यू
Kabul Taliban fighters pose for a photograph in Kabul, Afghanistan

अफगाणिस्तानमध्ये अजून तालिबान्यांचं रितसर राज सुरुही झालेलं नाही पण रोज नवे कारनामे समोर येतायत. त्यातल्याच एका घटनेनं लहान मुलांसह 17 जणांचा जीव घेतलाय. पंजशीर व्हॅलीत(Panjshir Valley) सध्या तालिबानी आणि नॉर्दन अलायन्स यांच्यात जोरदार लढाई सुरु आहे. त्यात पाकिस्तान मीडिया हा तालिबान्यांच्या बाजूनं रोज नव्या अफवा पसरवतोय. पंजशीर व्हॅलीवर तालिबान्यांनी कब्जा केल्याची अफवा पसरली आणि त्याचा आनंद साजरा करण्यासाठी त्यांनी राजधानी काबूलमध्ये जोरदार गोळीबार केला. तोही हवेत. पण ह्या गोळीबारानं
अनेकांचा जीव घेतला. आपला आनंद साजरा करताना, आपण स्वत:च्याच लोकांचे जीव घेतोय याचा विसरही तालिबान्यांना पडला.

दोन वृत्तवाहिन्यांचं वृत्त
अफगाणिस्तानमध्ये सध्या दोन वृत्तसंस्था आहेत. एक टोलो न्यूज, ज्याचं टीव्ही न्यूज चॅनलही आहे आणि दुसरी असवाका न्यूज एजन्सी. दोन्ही वृत्तसंस्थांनी दिलेल्या वृत्तानुसार- शुक्रवारी रात्री काबूलमध्ये तालिबाननं जो आनंदात गोळीबार केला, त्यात 17 जणांना जीव गमवावा लागलाय तर 41 जण जखमी झालेत. टोलो न्यूजनं ट्विट केलंय- काबूलच्या आपातकालीन हॉस्पिटलमध्ये 17 मृतदेह आलेले आहेत. 41 जणांना उपचारासाठी विशेष कक्षात पाठवलंय. बळी गेलेल्यांमध्ये लहान मुलांचाही समावेश आहे पण त्यांची नेमकी संख्या मात्र उघड केली जात नाहीय. तर असवाका न्यूजनुसार- पंजशीर घाटीवर नियंत्रण मिळवल्याचं वृत्त काबूलमध्ये धडकलं आणि आनंदी झालेल्या तालिबान्यांनी हवेत जोरदार गोळीबार केला. त्याचं फोटो, व्हिडीओही आता व्हायरल झालेत. असवाकानेही काही फोटो ट्विट केलेत. अनेक जण स्वत:च्या कुटुंबियांना हॉस्पिटलमध्ये जखमी अवस्थेत आणत असल्याचे फोटोही ट्विट केले गेलेत.


पंजशीरवर दावे प्रतिदावे
तालिबाननं बंदुकीच्या जोरावर अफगाणिस्तानवर कब्जा मिळवला पण पंजशीरवर त्यांना अजूनही ताबा मिळवता आलेला नाही. इथं माजी उपराष्ट्रपती अमरुल्ला सालेह आणि नॉर्दन अलायन्सचे नेते त्यांच्या सैनिकांसह लढतायत. तालिबानच्या कमांडरनं दावा केला की- अफगाणिस्तानमध्ये राष्ट्रीय प्रतिरोध मोर्चा(NRFA)पराभूत झालाय. अल्लाहच्या कृपेनं संपूर्ण पाकिस्तानवर आता आमचा(तालिबानचा)
कब्जा आहे. जे स्वत:ला संकटमोचक मानत होते त्यांचा पराभव झालाय आणि पंजशीर आता आमच्या ताब्यात आहे. पाकिस्तानी मीडियानेही तालिबानला साजेशे असेच रिपोर्ट प्रसारीत केले. पण खुद्द तालिबाननं मात्र याबाबत कुठलही अधिकृत दावा केलेला नाही. आंतरराष्ट्रीय न्यूज एजन्सी एएफपीनं स्थानिकांच्या हवाल्यानं बातमी देत, NRFA च्या पराभवाचं वृत्त खोटं असल्याचं म्हटलंय.


अमरुल्ला सालेहचा अफगाणिस्तानला संदेश
अफगाणिस्तानचे उपराष्ट्रपती अमरुल्ला सालेह हे सुद्धा देश सोडून पळाल्याचं वृत्त काही पाकिस्तानी चॅनल्सनं दिलं. पण स्वत: सालेहनं एक ऑडियो क्लीप जारी करत ह्या सगळ्या अफवा असल्याचं सांगितलं. सालेह म्हणतात- हा माझा आवाज आहे आणि मी पंजशीर घाटीतून बोलतोय. हा माझा बेस आहे. मी माझ्या राजकीय नेते आणि कमांडरांसोबत आहेत. अर्थातच हा एक कठिण प्रसंग आहे. तालिबान,
पाकिस्तान आणि अल कायदाच्या अतिक्रमनाचा आम्हाला धोका आहे. पण आम्ही लढतोय. अमरुल्ला सालेहच्या ह्या ऑडिओ क्लीपनंतर तालिबानी जो आनंद साजरा करत होते, त्यावर पाणी फेरलं गेलं.

350 तालिबानी ठार
अहमद मसूद यांच्या नेतृत्वात NRFA पंजशीर घाटीत लढतं आहे. पंजशीर अजूनही तालिबान्यांच्या ताब्यात नाही. शेवटची घनघोर लढाई तिथं सुरु आहे. गेल्या आठवडाभर पंजशीरमध्ये कशी लढाई सुरु आहे याचे वेगवेगळे वृत्त येतायत. एका रिपोर्टनुसार आठवड्याच्या सुरुवातीलाच तालिबानचे 350 अतिरेकी मारले गेले. 40 जणांना पकडल्याचाही दावा केलाय. हे सगळं खावकच्या लढाईत घडलंय. त्यामुळेच तालिबान्यांसाठी पंजशीरची लढाई वाटते तेवढी सोप्पी नाहीय.

तुझ्या गर्भात वाढणारं बाळ माझं नाही म्हणत मुंबईच्या पोलीस उपनिरीक्षकाचं घृणास्पद कृत्य, लाजिरवाणी घटना

‘त्यांना पाठिंबा देणाऱ्यांना आत्मनिरीक्षणाची गरज’, गीतकार जावेद अख्तरांनी केली आरएसएसची तुलना तालिबानशी!

काबूलमध्ये लागले ‘तालिबान सरकार’ स्थापनेसाठी होर्डिंग्ज, हक्कानी नेटवर्कलाही सत्तेत मिळेल स्थान, मुल्ला बरदार करतील नेतृत्व

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI