अफगाणिस्तानच्या मुद्द्यावर भारताकडून NSA स्तरावरील बैठकीचं आयोजन, पाकिस्तानने निमंत्रण नाकारलं, आता ‘हे’ देश होणार सहभागी!

| Updated on: Nov 02, 2021 | 5:35 PM

भारताने आयोजित केलेल्या प्रादेशिक परिषदेत सहभागी होण्याचे निमंत्रण पाकिस्तानने स्वीकारले आहे की नाही? यावर युसूफ म्हणाले की, 'मी जाणार नाही.' याआधी पाकिस्तानच्या परराष्ट्र कार्यालयाने सांगितलं होतं की, भारताने पाकिस्तानला परिषदेत सहभागी होण्याचे निमंत्रण दिले आहे.

अफगाणिस्तानच्या मुद्द्यावर भारताकडून NSA स्तरावरील बैठकीचं आयोजन, पाकिस्तानने निमंत्रण नाकारलं, आता हे देश होणार सहभागी!
पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मोईद यूसुफ (Pakistan NSA Moeed Yusuf)
Follow us on

India NSA Level Meeting on Afghanistan: अफगाणिस्तानातील परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी भारत NSA म्हणजेच राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांच्या स्तरावरील बैठकीचं आयोजन करणार आहे. यासाठी पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मोईद युसूफ यांनाही आमंत्रित करण्यात आलं आहे. मात्र त्यांनी या बैठकीला येण्यास नकार दिल्याचं कळतं आहे. उझबेकिस्तानसोबत सुरक्षा करारावर स्वाक्षरी करताना पाकिस्तानच्या NSA ने याची माहिती दिली आहे. पाकिस्तानी वृत्तपत्र बिझनेस रेकॉर्डने ही माहिती दिली आहे. (NSA level meeting from India on Afghanistan issue, Pakistan declined the invitation, now ‘this’ country will be a participant!)

भारताने आयोजित केलेल्या प्रादेशिक परिषदेत सहभागी होण्याचे निमंत्रण पाकिस्तानने स्वीकारले आहे की नाही? यावर युसूफ म्हणाले की, ‘मी जाणार नाही.’ याआधी पाकिस्तानच्या परराष्ट्र कार्यालयाने सांगितलं होतं की, भारताने पाकिस्तानला परिषदेत सहभागी होण्याचे निमंत्रण दिले आहे. भारताने रशिया, इराण, चीन, पाकिस्तान, ताजिकिस्तान आणि उझबेकिस्तानला अधिकृत निमंत्रण दिलं आहे. पुढील आठवड्यात ही बैठक होणार आहे.

आधी मॉस्कोमध्ये संपन्न

पूर्वी रशियाने अफगाणिस्तानच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी मॉस्कोमध्ये बैठक घेतली होती. ज्यामध्ये भारतही सामील झाला. मात्र, दोन्ही देशांच्या प्रतिनिधींनी दुसरी बैठक घेतली नाही. अफगाणिस्तानच्या अंतरिम सरकारचे उपपंतप्रधान अब्दुल सलाम हनाफी यांच्या नेतृत्वाखाली तालिबानच्या उच्चस्तरीय शिष्टमंडळाने यात भाग घेतला. यावेळी त्यांच्यात अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली.

बैठकीत भारत काय म्हणाला?

मॉस्को येथे झालेल्या बैठकीत भारताने या देशाला सर्वसमावेशक मानवतावादी मदत देण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यासाठी आपण तयार असल्याचेही सांगितले होते. ऑगस्ट महिन्यात तालिबानने अफगाणिस्तानवर ताबा मिळवला. अश्रफ गनी देश सोडून पळून गेले, आधीचं सरकार कोसळलं. त्यानंतर अख्ख्या जगाने अफगाणिस्तानला दिली जाणारी मदत थांबवली. त्यातच अफगाणिस्तानची अर्थव्यवस्था आता पूर्णपणे मोडकळीस आली आहे. लोकांच्या हाताला काम नाही. देशातील बहुतांश लोक एकवेळीच जेवण मिळवू शकतात अशी परिस्थिती तयार झाली आहे. या उपासमारीच्या परिस्थितीत अफगाणिस्तानातील लोकांची मदत केली नाही तर खूप लोक दगावतील असं संयुक्त राष्ट्राचं म्हणणं आहे. त्यामुळे मानवतेच्या दृष्टीकोनातून अफगाणिस्तानला मदत करण्यासाठी आता काही देश पुढं येताना दिसत आहेत.

हेही वाचा:

अफगानिस्तान पुन्हा हादरले! काबुलमध्ये बॉम्बस्फोट; 15 ठार

COP26 Climate Summit | 2070 पर्यंत भारतातील कार्बन उत्सर्जन शून्यावर, 2030 पर्यंत रेल्वेसमोर ‘नेट झिरो’चे लक्ष्य : मोदी