अफगाणिस्तान पुन्हा हादरले! काबुलमध्ये बॉम्बस्फोट; 15 ठार

पुन्हा एकदा अफगानिस्तान शक्तीशाली बॉम्बस्फोटाने हादरले आहे. अफगानिस्तानची राजधानी असलेल्या काबुलमध्ये बॉम्बस्फोट करण्यात आला आहे. या स्फोटात  15 नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

अफगाणिस्तान पुन्हा हादरले! काबुलमध्ये बॉम्बस्फोट; 15 ठार
अफगानिस्तान स्फोट
Follow us
| Updated on: Nov 02, 2021 | 5:38 PM

काबुल – पुन्हा एकदा अफगाणिस्तान शक्तीशाली बॉम्बस्फोटाने हादरले आहे.अफगाणिस्तानची राजधानी असलेल्या काबुलमध्ये बॉम्बस्फोट करण्यात आला आहे. या स्फोटात  15 नागरिकांचा मृत्यू झाला असून, शहरातील सरदार मोहम्मद दाऊद खान (Sardar Mohammad Daud Khan Hospital) रुग्णालयासमोर हा आत्मघाती हल्ला झाला. या हल्ल्यानंतर परिसरात गोळीबार झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शीकडून देण्यात आली आहे. मात्र हा हल्ला का करण्यात आला? हल्ल्याचा सूत्रधार कोण याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही.

अफगाणिस्तानमध्ये झालेल्या या हल्ल्याप्रकरणी अद्याप तालिबानच्या वतीने कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेले नाही, ऑगस्टमध्ये तालीबानने देशाचा कब्जा मिळवला होता. तेव्हापासून काबूलमध्ये हल्ल्यांना सुरुवात झाली असून, या सर्व हल्ल्यांमागे ‘इस्लामिक स्टेट’चा हात असल्याचे बोलले जात आहे. इस्लामिक स्टेटवर लवकरच नियंत्रण मिळू असे वारंवार तालीबानकडून सांगण्यात येत आहे. मात्र प्रत्यक्षात अफगाणिस्तानच्या उत्तर भागामध्ये संघटनेचे वर्चस्व वाढत असल्याचे दिसून येत आहे. इस्लामिक स्टेटला आळा घालण्याचे मोठे आव्हान आता तालीबानसमोर असणार आहे.

ऑगस्टमध्येही झाला होता स्फोट 

यापूर्वी देखील ऑगस्ट महिन्यात काबुलच्या विमानतळावर मोठा हल्ला करण्यात आला होता. 26 ऑगस्टला झालेल्या या हल्ल्यामध्ये तब्बल 100 जणांना आपला जीव गमावावा लागला. तर 150 पेक्षा अधिक जण जखमी झाले होते. तालीबानने अफगाणिस्तानचा ताबा मिळवल्यानंतर अनेक जण देश सोडून स्थलांतरणाच्या तयारीत असताना हा बॉम्बस्फोट करण्यात आला होता. त्यानंतर सातत्याने अफगाणिस्तानमध्ये बॉम्बस्फोट सुरूच आहेत. दरम्यान 26 ऑगस्टला झालेल्या या हल्ल्यामागे देखील इस्लामिक स्टेटचाच हात असल्याचे मानण्यात येत आहे.  या हल्ल्याची माहिती अधिच मिळाली होती. माहिती मिळाल्यानंतर अनेक देशांनी आपल्या नागरिकांना विमानतळापासून दूर राहाण्याचे आवाहन देखील केले होते. गुप्तचर संस्थांना बॉम्बस्फोट होणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर देखील हा हल्ला थांबवण्यात अपयश आहे. या बॉम्बस्फोटानंतर तालीबानला मदत करण्याचे आश्वासन अमेरीकेकडून देण्यात आले होते. मात्र अमेरिकेची मदत घेण्यास तालीबानने नकार दिला.

संबंधित बातम्या 

Russia Covid Update: रूसमध्ये मृत्यूंची विक्रमी वाढ; सप्टेंबरमध्ये 44,265 मृत्यू, World War II नंतर सर्वाधिक 

COP26 Climate Summit | 2070 पर्यंत भारतातील कार्बन उत्सर्जन शून्यावर, 2030 पर्यंत रेल्वेसमोर ‘नेट झिरो’चे लक्ष्य : मोदी

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.