Panjshir Valley : अजिंक्य पंजशीर खोऱ्यावर झेंडा फडकवल्याचा तालिबानचा दावा, सत्य काय?

| Updated on: Sep 04, 2021 | 8:27 AM

Panjshir Valley : रॉयटर्स या वृत्तसंस्थेने पंजशीरवर ताबा मिळवल्याचं वृत्त तालिबानच्या हवाल्याने दिलं आहे. तीन तालिबानी नेत्यांच्या दाव्यानुसार, आता आम्ही पूर्ण अफगाणिस्तानवर ताबा मिळवला आहे. यामध्ये पंजशीरचाही समावेश आहे.

Panjshir Valley : अजिंक्य पंजशीर खोऱ्यावर झेंडा फडकवल्याचा तालिबानचा दावा, सत्य काय?
TALIBAN ATTACK ON AFGHANISTAN 2
Follow us on

काबूल : अफगाणिस्तानवर (Afghanistan) ताबा मिळवल्यानंतर, पंजशीर खोऱ्यावर (Panjshir Valley) पकड मिळवण्यासाठी झगडणाऱ्या तालिबानने आता मोठा दावा केला आहे. काबूलवरील कब्जानंतर जवळपास 20 दिवसांनी आपण पंजशीर खोऱ्यावरही ताबा मिळवल्याचा दावा तालिबानने केला आहे. मात्र अफगाणिस्तानचे माजी उपराष्ट्रपती अमरुल्ला सालेहने तालिबानचा हा दावा फेटाळून लावला आहे. अजूनही लढाई सुरुच असून, पाकिस्तानी मीडियाकडून चुकीच्या बातम्या पेरल्या जात असल्याचा आरोप अहमद अहमद मसूदने केला आहे.

गेल्या काही दिवसांपासून अहमद मसूद आणि फगाणिस्तानचे माजी उपराष्ट्रपती अमरुल्ला सालेह या दोघांनी तालिबानविरुद्ध मोठा लढा उभारला आहे. त्यांना पंजशीर खोऱ्यात घुसूच दिलं नाही. सुरुवातीच्या काळात तालिबान आणि मसूद यांच्यात चर्चेच्या फेऱ्या झाल्या, मात्र त्यातून काहीच निष्कर्ष निघाला नव्हता. त्यामुळे तालिबानने थेट पंजशीरवर ताबा मिळवण्यासाठी आपल्या दहशतवादी पाठवले होते.

रॉयटर्स या वृत्तसंस्थेने पंजशीरवर ताबा मिळवल्याचं वृत्त तालिबानच्या हवाल्याने दिलं आहे. तीन तालिबानी नेत्यांच्या दाव्यानुसार, आता आम्ही पूर्ण अफगाणिस्तानवर ताबा मिळवला आहे. यामध्ये पंजशीरचाही समावेश आहे.

अजिंक्य पंजशीर

तालिबानने संपूर्ण अफगाणवर ताबा मिळवला. अगदी अमेरिकेलाही माघार घेण्यास भाग पाडलं. मात्र, अफगाणिस्तानमध्येच एक असा प्रांत आहे ज्याच्यावर तालिबानला अद्यापही ताबा मिळवता आला नाही. या प्रांताचं नाव आहे पंजशीरचं खोरं. पंजशीरवर आत्ताच काय, याआधी सुद्धा 2001 ला तालिबानची सत्ता असतानाही तालिबानला या भागावर नियंत्रण मिळवता आलेलं नव्हतं.

पंजशीर खोरं अफगाणिस्तानची राजधानी काबुलपासून 150 किलोमीटर अंतरावर आहे. पंजशीर खोरं हिंदुकुश पर्वतांच्या जवळ आहे. याच्या उत्तरेला पंजशीर नदी या भागाला उर्वरित अफगाणिस्तानपासून वेगळं करते. पंजशीरचा उत्तर भाग डोंगररागांनी वेढलेला आहे.

पंजशीर खोरं एकेकाळी शेर अहमद शाह मसूद यांचा गड होता. मात्र, 2001 मध्ये अमेरिकेत अल-कायदाने हल्ला करण्याआधी तालिबान्यांनी शेर अहमद शाह मसूद यांची हत्या केली होती. आता याच शेर अहमद शाह मसूद यांचा मुलगा अहमद मसूदने तालिबान्यांच्या नाकी नऊ आले आहेत.

 तालिबानविरुद्ध युद्धाची घोषणा

अफगाणिस्तानचे उपराष्ट्रपती अमरुल्ला सालेह यांनी तालिबानविरुद्ध युद्धाची घोषणा केलीय. देशाच्या घटनेनुसार राष्ट्रपतींच्या अनुपस्थितीत देशाचे कार्यवाहक राष्ट्रपती बनतात. त्याचप्रमाणे त्यांनी स्वतःला अफगाणिस्तानचे राष्ट्रपती घोषित केलेय. त्यांनी पंजशीर खोऱ्यातून तालिबानविरुद्ध युद्ध जाहीर केलेय. दुसरीकडे अहमद शाहचा मुलगा अहमद मसूदने म्हटले आहे की, तो आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवण्यास तयार आहे. मुजाहिद्दीन सेनानींनी पुन्हा एकदा तालिबानशी युद्धासाठी तयार राहावे. आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत त्यांनी एका फ्रेंच मासिकाच्या लेखात ‘तालिबानविरुद्ध युद्ध’ जाहीर केले.

संबंधित बातम्या 

संपूर्ण अफगाणवर तालिबान्यांचं राज्य, मात्र पंजशीर प्रांतावर नाही, कारण काय?   

अफगाणमधील पंजशीरमध्ये 350 तालिबान्यांचा खात्मा, 40 जण पकडले, स्थानिक नागरिकांच्या सैन्याचा दावा

Afghanistan : अफगाणिस्तानमध्ये तालिबानच्या नाकी नऊ आणणारी महिला कोण?