AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अफगाणमधील पंजशीरमध्ये 350 तालिबान्यांचा खात्मा, 40 जण पकडले, स्थानिक नागरिकांच्या सैन्याचा दावा

तालिबानने (Taliban) अफगाणी सैन्यासह अमेरिकेलाही गुडघे टेकायला लावत राजधानी काबुलसह अफगाणवर (Afghanistan) ताबा मिळवला. मात्र, त्यांना याच अफगाणिस्तानमधील पंजशीर खोऱ्यात (Panjshir Valley) अद्यापही ताबा मिळवता आलेला नाही. उलट या भागावर हल्ला करायला गेलेल्या तालिबान्यांच्या टोळीतील 350 जणांचा स्थानिक नागरिकांनी तयार केलेल्या सैन्याने खात्मा केलाय.

अफगाणमधील पंजशीरमध्ये 350 तालिबान्यांचा खात्मा, 40 जण पकडले, स्थानिक नागरिकांच्या सैन्याचा दावा
| Edited By: | Updated on: Sep 01, 2021 | 4:00 PM
Share

काबुल : तालिबानने (Taliban) अफगाणी सैन्यासह अमेरिकेलाही गुडघे टेकायला लावत राजधानी काबुलसह अफगाणवर (Afghanistan) ताबा मिळवला. मात्र, त्यांना याच अफगाणिस्तानमधील पंजशीर खोऱ्यात (Panjshir Valley) अद्यापही ताबा मिळवता आलेला नाही. उलट या भागावर हल्ला करायला गेलेल्या तालिबान्यांच्या टोळीतील 350 जणांचा स्थानिक नागरिकांनी तयार केलेल्या सैन्याने खात्मा केलाय. याशिवाय 40 जणांना या नागरिकांना जीवंत पकडलं आहे, असा दावा स्थानिक सैन्य असलेल्या नॉर्दन अलायन्सने केलाय. स्थानिक पत्रकारांनीही याबाबत ट्विट करत ही माहिती दिलीय.

तालिबानने सोमवारपासून (30 ऑगस्ट) पंजशीर खोऱ्यावर ताबा मिळवण्यासाठी हल्ले सुरू केलेत. मात्र नॉर्दन अलायन्सच्या सैनिकांनी तालिबान्यांना चोख उत्तर दिलंय. मंगळवारीही (31 ऑगस्ट) तालिबान्यांनी पंजशीरमध्ये घुसखोरीचा प्रयत्न केला. तालिबान्यांनी या भागातील एक पूल उद्ध्वस्त करुन नॉर्दन अलायन्सचा इतर पंजशीरपासून संपर्क तोडण्याचाही प्रयत्न केला. जेणेकरुन तालिबानच्या हल्ल्यानंतर त्यांना पळून जाताना रस्ते बंद राहतील. मात्र, हल्ल्यानंतर झालं उलटं. नॉर्दन अलायन्सचे सैनिकांनी तालिबान्यांनाच पळता भुई थोडी केली.

350 तालिबानी ठार, 40 तालिबान्यांना जीवंत पकडलं, नॉर्दन अलायन्सचं ट्विट

नॉर्दन अलायन्सने ट्विटरवर म्हटलं आहे, “पंजशीरमधील खावकमध्ये मंगळवारी रात्री तालिबानसोबत युद्ध झालं. यात 350 तालिबान्यांना ठार करण्यात आलं. तसेच 40 तालिबान्यांना जीवंत पकडण्यात आलंय. नाटो रिसॉन्स फोर्सला (NRF) या वेळी अनेक अमेरिकन वाहनं, शस्त्रं आणि दारुगोळा बक्षीस म्हणून मिळाला आहे. हे युद्ध खावकचे डिफेन्स कमांडर मुनिब अमिरी (Munib Amiri) यांच्या नेतृत्वात लढण्यात आले.”

गुलबहार भागाचा पूल उडवून पंजशीरशी संपर्क तोडण्याचा प्रयत्न

स्थानिक पत्रकार नातिक मालिकजादा यांनी पंजशीर युद्धावर ट्विट करत म्हटलं, “अफगाणिस्तानच्या पंजशीरमधील गुलबहार भागात तालिबान आणि नॉर्दर्न अलायन्समध्ये चकमक झाली. तालिबानने येथे एक पूल उडवला आहे. हा पूल गुलबहारला पंजशीरशी जोडतो.”

पंजशीर अफगाणिस्तामध्ये नेमकं कुठं आहे?

पंजशीर खोरं अफगाणिस्तानची राजधानी काबुलपासून 150 किलोमीटर अंतरावर आहे. पंजशीर खोरं हिंदुकुश पर्वतांच्या जवळ आहे. याच्या उत्तरेला पंजशीर नदी या भागाला उर्वरित अफगाणिस्तानपासून वेगळं करते. पंजशीरचा उत्तर भाग डोंगररागांनी वेढलेला आहे. दक्षिणेला कुहेस्तानची डोंगर रांग या भागाला वेढलेली आहे. या डोंगररांगा वर्षभर बर्फाखाली असतात. यावरुन हा भाग किती दुर्गम आहे हे लक्षात येईल. त्यामुळेच तालिबानला या भागात लढणं अडचणीचं ठरत आहे.

पंजशीरचं नेतृत्व कोण करतंय?

पंजशीर खोरं एकेकाळी शेर अहमद शाह मसूद यांचा गड होता. मात्र, 2001 मध्ये अमेरिकेत अल-कायदाने हल्ला करण्याआधी तालिबान्यांनी शेर अहमद शाह मसूद यांची हत्या केली होती. आता याच शेर अहमद शाह मसूद यांचा मुलगा अहमद मसूदने तालिबान्यांच्या नाकी नऊ आले आहेत. त्याने स्थानिक लोकांना प्रशिक्षित करुन स्थानिक सैन्य उभं केलं आहे. अश्रफ गनी सरकारमधील उप राष्ट्रपती आणि सध्या स्वयंघोषित कार्यवाहक राष्ट्रपती अमरुल्लाह सालेह देखील पंजशीरमध्ये मसूद यांच्यासोबत आहेत.

आतापर्यंत पंजशीरवर कुणालाही विजय मिळवता आला नाही

1980 च्या दशकापासून सोव्हिएत संघाचं सरकार असो की 1990 च्या दशकातील तालिबानची सत्ता असो अहमद शाह मसूदने या खोऱ्यावर कुणालाही विजय मिळवू दिलेला नाही. आधी पंजशीर खोरं परवान प्रांताचा भाग होतं. 2004 मध्ये त्याला वेगळ्या प्रांताचा दर्जा मिळाला. या भागात जवळपास 1.5 लाख लोकसंख्या राहते. या भागात ताजिक समूह बहुसंख्य आहे. मे 2021 पासून तालिबानने अफगाणवर हल्ला करत ताबा मिळवायला सुरुवात केली. तेव्हापासून हल्ला झालेल्या भागातील अनेक लोकांनी पंजशीर प्रांतात आसरा घेतला. तेव्हापासून या भागातून तालिबानला कडवट आव्हान निर्माण झालंय.

हेही वाचा :

ISIS मध्ये सामिल 25 भारतीय अफगाणिस्तानात, भारतात पाठवण्याचे प्रयत्न होण्याची शक्यता?

Qatar मध्ये भारताची तालिबानसोबत औपचारिक बैठक, जाणून घ्या काय झाली चर्चा

Video : अमेरिकेला मदत करणाऱ्याला हेलिकॉप्टरला टांगून हत्या, अंगावर काटा आणणारा व्हिडीओ

व्हिडीओ पाहा :

War in Panjshir 350 Talibani killed 40 captured claim Northern Alliance NRF Afghanistan

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.