Qatar मध्ये भारताची तालिबानसोबत औपचारिक बैठक, जाणून घ्या काय झाली चर्चा

कतारमधील (Qatar) भारताचे राजदूत दीपक मित्तल यांनी दोहा येथे तालिबानच्या राजकीय कार्यालयाचे प्रमुख शेर मोहम्मद अब्बास स्टानकझाई (Sher Mohammad Abbas Stanekzai) यांची भेट घेतली.

Qatar मध्ये भारताची तालिबानसोबत औपचारिक बैठक, जाणून घ्या काय झाली चर्चा

नवी दिल्ली : कतारमधील (Qatar) भारताचे राजदूत दीपक मित्तल यांनी दोहा येथे तालिबानच्या राजकीय कार्यालयाचे प्रमुख शेर मोहम्मद अब्बास स्टानकझाई (Sher Mohammad Abbas Stanekzai) यांची भेट घेतली. या दरम्यान, अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांच्या सुरक्षितता आणि जलद भारतात परतण्याबाबत चर्चा झाली. यासोबतच अफगाणिस्तानच्या (Afghanistan) भूमीचा भारताविरोधात दहशतवादासाठी वापर होऊ नये, याबाबत भारताने तालिबानकडे (Taliban) चिंता व्यक्त केली. तालिबानने यावेळी भारताशी संबंधित समस्या सकारात्मक पद्धतीने सोडवण्याचे आश्वासन दिले. (Indian officialls talks with Taliban, discusses safe evacuation and terrorism)

परराष्ट्र मंत्रालयाने मंगळवारी हे निवेदन जारी केले आणि या बैठकीची माहिती दिली. परराष्ट्र मंत्रालयाने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, “कतारमधील भारताचे राजदूत दीपक मित्तल यांनी दोहा येथील तालिबानच्या राजकीय कार्यालयाचे प्रमुख शेर मोहम्मद अब्बास स्टानकझाई यांची भेट घेतली. ही चर्चा अफगाणिस्तानात अडकलेल्या भारतीय नागरिकांच्या सुरक्षिततेवर आणि त्यांच्या जलद भारतात परतण्यावर केंद्रित होती.

मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, “राजदूत दीपक मित्तल यांनी भारताकडून चिंता व्यक्त केली की अफगाणिस्तानची भूमी कोणत्याही प्रकारे भारतविरोधी कारवाया आणि दहशतवादासाठी वापरली जाऊ नये. तालिबानच्या प्रतिनिधीने राजदूताला आश्वासन दिले की, हे मुद्दे सकारात्मकपणे सोडवले जातील.

अमेरिकेची अफगाणिस्तानमधील सैन्य मोहिम संपली

अफगाणिस्तानमधील अमेरिकेच्या सैन्य मोहिमेचा अखेर 19 वर्षे, 10 महिने आणि 25 दिवसांनी शेवट झाला आहे. तालिबानने अमेरिकेला 31 ऑगस्टपर्यंत देश सोडण्यास सांगितलं होतं. त्यामुळे 31 ऑगस्टच्या शेवटापर्यंत अफगाणमध्ये अडकलेल्या नागरिकांना वाचवण्याची मोहिम चालेल असा अंदाज होता. मात्र, अमेरिकेने 30 ऑगस्टच्या रात्रीच अफगाणिस्तान सोडलं. यानंतर तालिबानने लगेचच अफगाणसाठी स्वातंत्र्य दिवस असल्याचं घोषित केलं.

अमेरिकेच्या शेवटच्या 3 सी-17 विमानांनी 30 ऑगस्टला रात्री उरलेल्या अमेरिकन सैनिकांसह हामिद करजई आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन उड्डान केलं. यासह अमेरिकेचं अफगाणमधील अस्तित्व संपलंय. हा अफगाणमधील युद्धाचा शेवट की नव्या युद्धाची आणि अनागोंदीची सुरुवात हे मात्र येणाऱ्या काळातच स्पष्ट होणार आहे. मात्र, सध्या तरी अफगाणमध्ये शरिया कायद्याच्या नावाखाली सर्वसामान्यांवर अनेक निर्बंध लादले जात आहेत. त्यामुळे अफगाणचं भविष्य सध्या तरी तालिबानी नियंत्रणात अंधारातच दिसत आहे.

इतर बातम्या

US troops exit : सर्वात शेवटी अफगाणिस्तानची भूमी सोडली, कोण आहे अमेरिकेचा ‘आर्मी जनरल’?

बुशपासून बायडनपर्यंत 4 राष्ट्राध्यक्ष बदलले, ट्रिलियन डॉलर खर्च, अमेरिकेला काय मिळालं? 20 वर्षांच्या अफगाण युद्धावर एक नजर

काबुलमध्ये ‘इस्राईल-पॅलेस्टाईन’ प्रमाणे युद्ध, रॉकेट हल्ले करत अमेरिकेला कोण आव्हान देतंय?

(Indian officialls talks with Taliban, discusses safe evacuation and terrorism)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI