काबुल : अफगाणिस्तानची राजधानी काबुलमध्ये सध्या इस्राईल-पॅलेस्टाईनमध्ये झालेल्या युद्धाप्रमाणे परिस्थिती तयार झालीय. अमेरिकेने आपलं सैन्य माघारी बोलावलं आहे. त्याआधी अमेरिकेसह नाटो देशांनी काबुल विमानतळावर नियंत्रण ठेवत अफगाणमधील परदेशी नागरिक आणि देश सोडू इच्छिणाऱ्या अफगाण नागरिकांसाठी मदत अभियान राबवलं. यासाठी तालिबानने 31 ऑगस्टची मूदत दिली. त्याला अवघा एक दिवस बाकी असतानाच काबुल विमानतळावर सोमवारी (30 ऑगस्ट) रॉकेटचा पाऊस पडला. यामुळेच काबुलमध्ये इस्राईल-पॅलेस्टाईन युद्धाप्रमाणे स्थिती तयार झाल्याची चर्चा आहे. मात्र, यामागे कोण आहे असाही प्रश्न उपस्थित होतोय.