AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अमेरिकेची कमाल, काबूल एअरपोर्टरवर डागलेली 5 रॉकेट्स जिथल्या तिथे निकामी!

मेरिकेच्या डिफेन्स मिसाईल सिस्टिमने आधीच धोका ओळखून, या रॉकेटचा हल्ला होण्यापूर्वीच ती निकामी केली. अमेरिकेने हा हल्ला परतवल्याने मोठा अनर्थ टळला. इंटरसेप्ट अर्थात आपल्या दिशेने येणारे रॉकेट किंवा मिसाईलचा शोध घेऊन, त्यावर कारवाई करणं.

अमेरिकेची कमाल, काबूल एअरपोर्टरवर डागलेली 5 रॉकेट्स जिथल्या तिथे निकामी!
kabul-
| Edited By: | Updated on: Aug 30, 2021 | 11:50 AM
Share

वॉशिंग्टन : काबूल एअरपोर्टच्या दिशेने सोडण्यात आलेली पाच विध्वंसक रॉकेट अमेरिकेने निकामी केली. हल्ल्याच्या दृष्टीने ही पाच रॉकेट (five rockets)  काबूल विमानतळाच्या दिशेने सोडण्यात आली होती. मात्र अमेरिकेच्या डिफेन्स मिसाईल सिस्टिमने (missile defense system) आधीच धोका ओळखून, या रॉकेटचा हल्ला होण्यापूर्वीच ती निकामी केली. अमेरिकेने हा हल्ला परतवल्याने मोठा अनर्थ टळला. इंटरसेप्ट अर्थात आपल्या दिशेने येणारे रॉकेट किंवा मिसाईलचा शोध घेऊन, त्यावर कारवाई करणं.

अमेरिकन सैन्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आम्ही हे रॉकेट निकामी केली आहेत. पण ती सर्वच्या सर्व निकामी झाली आहेत की नाही याबाबत पुष्टी होऊ शकली नाही. सोमवारी सकाळी हे हल्ले झाले होते.

ड्रोन हल्ले

अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॅक सुलिवान यांच्या मते, या हल्ल्याची माहिती राष्ट्रपती जो बायडन यांनाही देण्यात आली आहे. दरम्यान, अमेरिकेने रविवारी काबूलमधील दहशतवाद्यांच्या ठिकाणांवर ड्रोन हल्ले केले. यामध्ये एका आत्मघाती हल्लेखोरालाही टार्गेट करण्यात आलं. हा हल्लेखोर काबूल विमानतळावर हल्ला करण्याच्या तयारीत होता, असं सांगण्यात येत आहे.

अमेरिकेच्या मते, काबूल एअरपोर्टवर आयसिसचे दहशतवादी पुन्हा हल्ला करु शकतात. अमेरिकन सैन्य त्यांच्या रडारवर आहे. हे सैन्य सध्या काबूलमध्येच आहे. अमेरिका आपल्या सैन्याला 31 ऑगस्टपूर्वी तिथून हटवण्याच्या तयारीत आहे.

आयसिसचा हल्ला 

अफगाणिस्तानची राजधानी काबूल पुन्हा एका मोठ्या स्फोटानं हादरलीय. आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना ISIS नं आठवड्याभरात सलग दुसरा हल्ला केलाय. एक रॉकेट काबूल एअरपोर्ट(kabul airport)च्या दिशेनं सोडण्यात आलं. अर्थात टार्गेटवर अमेरीकन सैनिक आणि जिथून अमेरीकन विमानं उड्डान भरतायत तो भाग होता. पण हे हल्ला करण्यात आलेलं रॉकेट लक्ष्य भेदू शकलं नाही. आणि ते रॉकेट जवळच्याच निवासी भागात कोसळलं.

बदल्याचं चक्र

इसिसिनं आधी काबूल एअरपोर्टवर हल्ला केला, ज्यात 169 अफगाण नागरीक आणि 13 अमेरीकन सैनिकांचा बळी गेला. त्याचा बदला म्हणून अमेरीकेनं इसिसिच्या ठिकाण्यांवर ड्रोन हल्ला केला (US drone strike). परत याचा बदला म्हणून इसिसिनं हल्ला केल्याचं वृत्त आहे. प्राथमिक माहितीनुसार दोन जणांना जीव गमवावा लागलाय. काही जण जखमी आहेत. मृत आणि जखमींमध्ये मुलं आणि महिलांचा समावेश आहे. एअरपोर्टकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यापासून 1 कि.मी. अंतरावर हा हल्ला केला गेलाय.

संबंधित बातम्या  

Yemen: सौदी अरबच्या नेतृत्वातील येमेन सैन्य छावणीवर मोठा हल्ला, 30 जवानांचा मृत्यू, तर 60 सैनिक जखमी

काबूल आणखी एका स्फोटानं हादरलं, इसिसचा रॉकेट हल्ला, 2 जणांचा मृत्यू, आकडा वाढण्याची भीती

अफगाणी चिमुरड्याला आईप्रमाणे प्रेम करणारी अमेरिकन महिला सैनिकही स्फोटात शहीद

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.