संपूर्ण अफगाणवर तालिबान्यांचं राज्य, मात्र पंजशीर प्रांतावर नाही, कारण काय?

तालिबानने संपूर्ण अफगाणवर ताबा मिळवला आहे. अगदी अमेरिकेलाही माघार घेण्यास भाग पाडलं. मात्र, अफगाणिस्तानमध्येच एक असा प्रांत आहे ज्याच्यावर तालिबानला अद्यापही ताबा मिळवता आला नाही. या प्रांताचं नाव आहे पंजशीरचं खोरं. पंजशीरवर आत्ताच काय, याआधी सुद्धा 2001 ला तालिबानची सत्ता असतानाही तालिबानला या भागावर नियंत्रण मिळवता आलं नाही.

1/7
तालिबानने संपूर्ण अफगाणवर ताबा मिळवला आहे. अगदी अमेरिकेलाही माघार घेण्यास भाग पाडलं. मात्र, अफगाणिस्तानमध्येच एक असा प्रांत आहे ज्याच्यावर तालिबानला अद्यापही ताबा मिळवता आला नाही. या प्रांताचं नाव आहे पंजशीरचं खोरं.

2/7
पंजशीरवर आत्ताच काय, याआधी सुद्धा 2001 ला तालिबानची सत्ता असतानाही तालिबानला या भागावर नियंत्रण मिळवता आलं नाही.

3/7
पंजशीर खोरं अफगाणिस्तानची राजधानी काबुलपासून 150 किलोमीटर अंतरावर आहे. पंजशीर खोरं हिंदुकुश पर्वतांच्या जवळ आहे. याच्या उत्तरेला पंजशीर नदी या भागाला उर्वरित अफगाणिस्तानपासून वेगळं करते. पंजशीरचा उत्तर भाग डोंगररागांनी वेढलेला आहे.

4/7
दक्षिणेला कुहेस्तानची डोंगर रांग या भागाला वेढलेली आहे. या डोंगररांगा वर्षभर बर्फाखाली असतात. यावरुन हा भाग किती दुर्गम आहे हे लक्षात येईल. त्यामुळेच तालिबानला या भागात लढणं अडचणीचं ठरत आहे.

5/7
पंजशीर खोरं एकेकाळी शेर अहमद शाह मसूद यांचा गड होता. मात्र, 2001 मध्ये अमेरिकेत अल-कायदाने हल्ला करण्याआधी तालिबान्यांनी शेर अहमद शाह मसूद यांची हत्या केली होती. आता याच शेर अहमद शाह मसूद यांचा मुलगा अहमद मसूदने तालिबान्यांच्या नाकी नऊ आले आहेत.

6/7
अहमद मसूदने स्थानिक लोकांना प्रशिक्षित करुन स्थानिक सैन्य उभं केलं आहे. अश्रफ गनी सरकारमधील उप राष्ट्रपती आणि सध्या स्वयंघोषित कार्यवाहक राष्ट्रपती अमरुल्लाह सालेह देखील पंजशीरमध्ये मसूद यांच्यासोबत आहेत.

7/7
1980 च्या दशकापासून सोव्हिएत संघाचं सरकार असो की 1990 च्या दशकातील तालिबानची सत्ता असो अहमद शाह मसूदने या खोऱ्यावर कुणालाही विजय मिळवू दिलेला नाही.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI