बोत्सवाना या छोट्याशा आफ्रिकी देशाने भारताला दिलं मोठं गिफ्ट

बोत्सवानाची राजधानी गाबोरोने मध्ये गार्ड ऑफ ऑनर दिल्यानंतर राष्ट्रपती डूमा गिदोन बोकोने यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना निरोप दिला. राष्ट्रपति मुर्मू यांचा हा दौरा आठ ते 13 नोव्हेंबर पर्यंत होता.

बोत्सवाना या छोट्याशा आफ्रिकी देशाने भारताला दिलं मोठं गिफ्ट
African Country botswana Tour
| Updated on: Nov 14, 2025 | 1:38 PM

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू गुरुवारी अंगोला आणि बोत्सवाना या देशांचा सहा दिवसीय राजकीय दौरा संपवून दिल्लीसाठी रवाना झाल्या. यावेळी बोत्सवाना या छोट्याशा आफ्रिकी देशाने भारताला एक मोठं गिफ्ट दिलं. प्रोजेक्ट चीताच्या पुढच्या टप्प्यासाठी बोत्सवानाने प्रतीकात्मक आठ चीत्ते भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे सोपवले. बोत्सवाना आफ्रिकी देश आहे. क्वारंटीन पीरियडनंतर सर्व आठ चीत्ते भारतात आणले जातील. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ऊर्जा, व्यापार आणि गुंतवणूकीसह विभिन्न क्षेत्रात भागीदारी अधिक दृढ करण्याच्या भारताच्या संकल्पाचा पुनरुच्चार केला.

बोत्सवानाची राजधानी गाबोरोने मध्ये गार्ड ऑफ ऑनर दिल्यानंतर राष्ट्रपती डूमा गिदोन बोकोने यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना निरोप दिला. राष्ट्रपति मुर्मू यांचा हा दौरा आठ ते 13 नोव्हेंबर पर्यंत होता. या दोन आफ्रिकी देशांचा कुठल्याही भारतीय राष्ट्रपतीने केलेला हा पहिला दौरा आहे. भारतीय परराष्ट्र मंत्रालयातील सचिव (आर्थिक संबंध) सुधाकर दलेला यांनी राष्ट्रपतींनी प्रस्थान करण्यापूर्वी एक पत्रकार परिषद घेतली. त्यात ते म्हणाले की, ‘आफ्रिकी खंडासोबत भारताचे संबंध भक्कम करण्याची उच्च प्राथमिकता यातून दिसून येते’

कुठल्या उद्योगात करणारं सहकार्य?

बोत्सवानासोबत आर्थिक, विकास आणि टेक्नोलॉजी सहकार्य मजबूत करण्याचा भारताचा संकल्प त्यांनी बोलून दाखवला. हीरा उत्पादनात बोत्सवानाला भारत सहकार्य करेल असं दलेला म्हणाले. भारतात विलुप्त झालेल्या चित्त्यांची संख्या वाढवण्यासाठी त्यांचं स्थानांतरण करण्यात येणार आहे. या करारातंर्गत बोत्सवानाकडून प्रतिकात्मक स्वरुपात राष्ट्रपती मुर्मू यांनी आठ चीत्ते स्वीकारले.

कुठल्या करारावर स्वाक्षरी?

दोन्ही देशांनी स्वस्तात औषध उपलब्ध करुन देण्यासाठी एका करारावरही स्वाक्षरी केली असं दलेला म्हणाले. दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात मुर्मू यांनी अंगोलाची राजधानी लुआंडा येथे राष्ट्रपती जोआओ मॅनुअल गोनकाल्विस लौरेंको यांची भेट घेतली. ऊर्जा आणि जैव इंधनाच्या क्षेत्रात भागीदारी, सहकार्यांची लौरेंको यांनी अपेक्षा व्यक्त केली. राष्ट्रपति मुर्मू यांनी दीर्घकालिक ऊर्जा खरेदी आणि पेट्रोलियम शोधात गुंतवणूक करण्याची भारतीय कंपन्यांची इच्छा व्यक्त केली.