अमेरिकेत मोठी खळबळ, सर्व विमान उड्डाणे अचानक रद्द, हजारो प्रवासी अडकले, थेट..
अमेरिकेतून खळबळ उडवणारी बातमी पुढे येत आहे. थेट अमेरिकेतील विमानांचे उड्डाण पूर्णपणे थांबले आहे. एकही विमान उड्डाण घेत नाहीये. अमेरिकेत स्थिती अत्यंत गंभीर असून हजारो प्रवासी विमानतळावर अडकले आहेत.

अमेरिकेतून एक मोठी धक्कादायक बातमी पुढे येत आहे. ज्यामुळे एकच मोठी खळबळ उडाली. अमेरिकेतील विमान सेवा पूर्णपणे ठप्प झाली. एकही विमान उडत नाही. एक मोठी समस्या निर्माण झाली. अमेरिकेच्या फेडरल एव्हिएशन ॲडमिनिस्ट्रेशन (FAA) च्या निर्देशानुसार, देशभरातील सर्व उड्डाणे थांबवण्यात आली आहेत. सध्याच्या घडीला एकही विमान उड्डाण घेत नाहीये. अमेरिकेतील विमाने जमिनीवरच रोखून धरल्यामुळे देशभरातील प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून विमानतळावर एकच गोंधळाची स्थिती निर्माण झाली. स्थिती अधिक गंभीर होत आहे. प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. एका दणक्यात पूर्ण विमान सेवा विस्कळीत झाली. ही समस्या नेटवर्क राऊटरमधील बिघाडामुळे झाल्याचे कळत आहे. त्याचा परिणाम पूर्ण अमेरिकेतील विमान सेवेवर झाला.
अमेरिकेच्या फेडरल एव्हिएशन ॲडमिनिस्ट्रेशनने एका अलर्टद्वारे कळवले आहे की, पुढील सूचना मिळेपर्यंत सर्व विमानांचे उड्डाण थांबवण्यात आले आहे. या घटनेमुळे 7000 हून अधिक विमानांवर परिणाम झाला आहे. थेट 7000 विमानांचे उड्डाण थांबवण्याची वेळ आली. अमेरिकेचे परिवहन सचिव शॉन डफी यांनी एक्सवर पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली.
त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, सर्व एअर रूट ट्रॅफिक कंट्रोल सेंटर्सवर परिणाम करणाऱ्या समस्येमुळे एफएएने संपूर्ण अमेरिकेतील विमानतळांवर विमान उड्डाणे थांबवण्याचा आदेश दिला आहे. एफएएचे तंत्रज्ञ या समस्येची तपासणी करत आहेत. अधिक माहिती मिळताच आम्ही त्याबाबत अपडेट देऊ. सध्याच्या घडीला अमेरिकेत विमान सेवेचे बारा वाजल्याचे बघायला मिळत आहे.
अचानक हजारो विमानांची सेवा विस्कळीत झाल्याने मोठा गोंधळ अमेरिकेत उडाला आहे. प्रवासी विमानतळावर उडकले आहेत. पुन्हा सेवा कधी सुरू होणार याचे उत्तर विमान कंपन्यांकडेही नाहीये. नक्की काय झाले याचा तपास सुरू आहे. मात्र, यामुळे अमेरिकेत चांगलाच मोठा हाहाकार उडाल्याचे बघायला मिळत आहे. अमेरिकेतील या स्थितीकडे जगाच्या नजरा लागल्याचे बघायला मिळत आहे. पहिल्यांदाच अमेरिकेतील विमानसेवेवर असा परिणाम झाल्याचे बोलले जात आहे.