Jeff Bezos Wedding : अब्जाधीश जेफ बेझोसचे वेडिंग कार्ड व्हायरल, एवढ्या पैशांत तर..

अमेझॉनचे जेफ बेझोस आणि लॉरेन सांचेज यांच्या लग्नाची सगळीकडेच चर्चा सुरू असून आता त्यांचं वेडिंग कार्ड, इनव्हिटेशनही समोर आलं आहे. सोशल मीडियावर ते कार्ड व्हायरल झालं असलं तरी ते पाहून अनेक यूजर्स हैराण झालेत. जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्तींच्या यादीत दुसऱ्या स्थानावर असलेल्या जेफ बेझोसच्या वेडिंग कार्डबद्दल लोकांचं काय मतं आहे, काय कमेंट्स येत आहेत चला जाणून घेऊया.

Jeff Bezos Wedding : अब्जाधीश जेफ बेझोसचे वेडिंग कार्ड व्हायरल, एवढ्या पैशांत तर..
अमेझॉनचे जेफ बेझोस आणि लॉरेन सांचेज यांचं आज लग्न
Image Credit source: social media
| Updated on: Jun 27, 2025 | 9:24 AM

जगातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती, ॲमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस हे सध्या त्यांच्या लग्नामुळे चर्चेत आहेत. इटलीच्या व्हेनिस या सुंदर शहरात ते वयाच्या 61व्या वर्षी दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधणार असून लॉरेन सांचेज यांच्याशी विवाहबद्ध होणार आहेत. शतकातील सर्वात मोठा शाही विवाह सोहळा असलेला हा विवाह आज म्हणजेच 27 जूनला पार पडणार आहे. मात्र याच हाय-प्रोफाईल वेडिंगपूर्वी त्यांच्या लग्नाचे इनव्हिटेशन कार्ड सोशल मीडियावर व्हायरल झालं असून सध्या सगळीकडे त्याची चर्चा नाही तर त्याबद्दल ट्रोलिंग सुरू आहे.

कार्ड पाहून सोशल मीडियावर गदारोळ

जेफ बेझोस आणि लॉरेन यांच्या लग्नाचं कार्ड समोर येताच सोशल मीडियावरील यूजर्सना आश्चर्याचा धक्का बसला आहे. अनेक यूजर्सना या कार्डचे डिझाइन खूपच बेसिक आणि साधं वाटलं. हे कार्ड मायक्रोसॉफ्ट पेंटने बनवले आहे का? असा सवाल एक्स (पूर्वीचे ट्विटर) वरील एका यूजरने विचारलाय. तर पैसा आहे पण क्लास नाही! अशा शब्दांत आणखी एका यूजरने टीका केली. अब्जाधीश असेलल्या जेफ बेझोस यांच्याकडून लोकांना काही शानदार आणि क्रिएटीव्ह कार्डची अपेक्षा होती, पण त्यांचं समोर आलेलं वेडिंग कार्ड पाहून अनेकांची घोर निराशा झाली.

कोण आहे लॉरेन सांचेज ?

आज पार पडणाऱ्य़ा या लग्न सोहळ्यासाठी 200 पेक्षा कमी लोक येणार आहेत. जेफ आणि लॉरेन यांनी जास्त पाहुण्यांना बोलावलेलं नाही. जेफ बेझोस यांची होणारी पत्नी लॉरेन सांचेज अमेरिकेतील लेखिका आणि पत्रकार आहे. तिने अमेरिकन टीव्हीवर बराच काळ काम केलं असून लॉरेन ही खूप लोकप्रिय चेहरा आहे. सांचेझ आणि बेझोस सुमारे सहा वर्षांपासून एकत्र आहेत. रिपोर्ट्सनुसार, जेप बेझसने 2023 साली लॉरेन हिला सुमारे 34 दशलक्ष डॉलर्स (सुमारे 2530 कोटी रुपये) किमतीची प्लॅटिनम डायमंड रिंग देऊन प्रपोज केले.

व्हेनिसमध्ये रॉयल वेडिंग, पाहुण्यांसाठी शाही थाट

ॲमेझॉनचे संस्थापक असेलल्या जेफ बेझोस आणि लॉरेन यांचा हा विवाह सोहळा 3 दिवस चालणार असून संपूर्ण जगाचं लक्ष त्याकडे वेधलं गेलं आहे. व्हेनिसमधील आलिशान हॉटेल्समध्ये पाहुण्यांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे, ज्यामध्ये हॉटेल ग्रिटी पॅलेस, सेंट रेजिस, बेलमंड सिप्रियानी आणि हॉटेल डॅनिएली सारख्या आलिशान रिसॉर्ट्सचा समावेश आहे.

इतकंच नव्हे तर लग्नात येणाऱ्या पाहुण्यांना थेट कार्यक्रमस्थळी आणता यावे यासाठी 90 खाजगी जेट 30 ३० वॉटर टॅक्सी तैनात करण्यात आल्या आहेत. पाहुण्यांना नदीमार्गे कार्यक्रमस्थळी नेण्याची ही व्यवस्था व्हेनिसच्या सौंदर्यात भर घालेल.

ट्रोलिंगनतंरही जेफ बेझोसचं लग्न चर्चेत

बेझोस यांच्या लग्नाचे कार्ड सोशल मीडियावर ट्रोल झाली असली तरी त्या दोघांच्या लग्नाबद्दल लोकांच्या मनात असलेली उत्सुकता कमी झालेली नाही. जगभरातून व्हीआयपी पाहुणे येण्याची अपेक्षा आहे आणि लग्नाच्या प्रत्येक पैलूचे मीडियामध्ये बारकाईने कव्हरेज केले जात आहे. त्यांची निमंत्रण पत्रिका साधी असली तरी, बेझोसचे लग्न एका अब्जाधीशाकडून असेल्या अपेक्षेप्रमाणे एक भव्य आणि संस्मरणीय कार्यक्रम असेल हे नक्कीच.