रशियाने जगाला दाखवली भारतासोबतची मैत्री, अमेरिकाही मदतीला धावली, थेट भारतात दोन…

इराण आणि अमेरिका युद्ध पेटले होते. अमेरिकेला अजिबात वाटले नव्हते की, हे युद्ध इतके जास्त भयंकर असेल. इराणकडूनही मोठे हल्ले केले जात आहे. इस्त्रायलसोबतच अमेरिकेचेही मोठी नुकसान या युद्धात होताना दिसत आहे. सर्व जग युद्धामुळे तणावात आहे.

रशियाने जगाला दाखवली भारतासोबतची मैत्री, अमेरिकाही मदतीला धावली, थेट भारतात दोन...
India Russia and America
| Updated on: Mar 23, 2026 | 8:14 AM

इराण आणि अमेरिका युद्धाला एक महिना पूर्ण होईल. 28 फेब्रुवारी 2026 रोजी इस्त्रायल आणि अमेरिकेकडून संयुक्त हल्ला इराणवर करण्यात आला. इराण आणि अमेरिका युद्ध टोकाला पोहोचले आहे. होर्मुज खाडी बंद आहे. भारताचे 22 जहाज तिथे अडकून पडले आहेत. स्थिती बिकड होत आहेत. भारतात एलपीजी गॅसचा मोठा तुटवडा निर्माण झाला. यासोबतच कच्च्या तेलाचीही समस्या आहे. पाकिस्तानमध्ये तीनतेरा वाजले आहेत. भारत सरकारकडून सतत तेल आणि एलपीजी गॅस भारतात आणण्याकरिता प्रयत्न केली जात आहेत. यादरम्यानच आता एक नवीन चित्र नुकताच बघायला मिळतंय. भारतात कच्च्या तेलाचा तुटवडा निर्माण होत असतानाच भारताच्या मदतीला रशिया आणि अमेरिका धावून आल्याचे बघायला मिळतंय.

देशातील सर्वात मोठे अंडरग्राऊंट एलपीजी म्हणजेच लिक्किफाईट पेट्रोलियम गॅस स्टोरेजवर रशिया आणि अमेरिका यांचे जहाज एलपीजी आणि कच्चे तेल घेऊन पोहोचले आहेत. यामधील खास बाब म्हणजे रशियाच्या तेलामुळे भारत आणि अमेरिकेमधील तणाव वाढला होता. या काळात फक्त रशियाच नाही तर अमेरिकाही भारताच्या मदतीला आला. अमेरिका आणि रशियाची जहाजे न्यू मंगलुरू येथील बंदरावर पोहोचले आहेत.

टेक्सासच्या पोर्ट ऑफ नीदरलॅंडहून हे जहाज भारताच्या दिशेने निघाली होते. रशियाचे एक्का टायटन नावाचे जहाज कच्चे तेल घेऊन भारतात पोहोचले आहे. शनिवारी हे जहाज मंगलुरू येथे पोहोचले. या जहाजात 7.7 लाख बॅरल कच्चे तेल असल्याची माहिती आहे. हे चक्क तेल समुद्रात बनलेली पाईपलाईनच्या माध्यमातून मंगलुरू रिफायनरीपर्यंत पोहोचवले जाईल. नुकताच मिळालेल्या माहितीनुसार, रशियाने आपल्या तेल जहाजांचा मार्ग बदलला आहे.

इराण आणि अमेरिका युद्धात अनेक देशात एलपीजी गॅसची मोठी समस्या आहे. भारतातही एलपीजी गॅसचा तुटवडा असून व्यावसायिक सिलेंडरचे वितरण बंद करण्यात आले. यादरम्यानच रशिया आणि अमेरिका दोन्ही देश भारताच्या मदतीला आले. इराण आणि अमेरिका युद्धाचा मोठा फटका अनेक देशांना बसताना दिसत आहे. तेलाच्या किमतीमध्ये मोठी वाढ होत आहे. त्यामध्येच या युद्धात तेल रिफायनरीला टार्गेट करून हल्ले केले जात आहेत.

Follow Us