AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अमेरिकेमुळे भारत संकटात, अमेरिकेची ती एक धमकी आणि थेट इराणकडून…

अमेरिका आणि इराण युद्ध सुरू आहे. या युद्धात इस्त्रायल आणि अमेरिकेला धक्का बसताना दिसत आहे. आता जगातील सर्वच देशांची मदत इस्त्रायलने मागितली आहे. मात्र, एकदी देश मदतीकरिता थेटपणे पुढे येताना दिसत नाही. त्यामध्येच इराणकडून अत्यंत खतरनाक धमकी देण्यात आली.

अमेरिकेमुळे भारत संकटात, अमेरिकेची ती एक धमकी आणि थेट इराणकडून...
America and Iran war
| Updated on: Mar 23, 2026 | 7:45 AM
Share

28 फेब्रुवारी 2026 रोजी इस्त्रायल आणि अमेरिकेकडून घातक हल्ला इराणवर करण्यात आला. या हल्ल्यात इराणचे सर्वाेच्च नेते ठार झाले. ज्या ज्या आखाती देशात अमेरिकेचे लष्कर तळ आहेत, अशा ठिकाणी मोठा हल्ला इराणकडून करण्यात आला. यासोबतच होर्मुज खाडीही इराणने बंद केली. होर्मुज खाडी बंद असल्याने अनेक देशांच्या तोंडचे पाणी पळाले. होर्मुज खाडी सुरू करण्याची मागणी सातत्याने केली जात आहे. मात्र, अमेरिकेने ही खाडी सुरू करण्यासाठी धमक्या, हल्ले सर्वकाही करून बघितले पण होर्मुज खाडी सुरक्षित करण्यात त्यांना अजिबातच यश मिळत नाहीये. यादरम्यानच आता इस्त्रायलकडून जगातील देशांना युद्धात मदत मागण्यात आली. मात्र, एकही देश युद्धात पडत नाहीये. अमेरिकेनेही या युद्धात मदत मागितली होती पण एकही देश अमेरिकेच्या मदतीला पुढे आला नाही. सर्वांना युद्धापासून दूर राहायचे आहे. शिवाय या युद्धामुळे अनेक देश संकटात आहेत. युद्ध लवकरात लवकर थांबवावे, अशी मागणी सातत्याने केली जात आहे.

मध्य पूर्वेतील संघर्ष अधिकच धोकादायक बनला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट शब्दात म्हटले की, जर इराणकडून होर्मुज सामुद्रधुनी पूर्णपणे खुली केली नाही तर आम्ही त्यांच्या ऊर्जा प्रकल्पांवर हल्ला करू. त्यानंतर इराणकडूनही सडेतोड उत्तर अमेरिकेला देण्यात आले. इराणने स्पष्ट शब्दात म्हटले की, जर तुम्ही इराणच्या ऊर्जा प्रकल्पांवर हल्ला केला तर आम्ही होर्मुज खाडी पूर्णपणे बंद करू.

आता अमेरिका आणि इराण यांच्या धमक्यांमध्ये मध्य पूर्वेतील तणाव अधिक वाढल्याचे बघायला मिळत आहे. इराणकडून अजून होर्मुज खाडी पूर्णपणे बंद करण्यात आली नाही. भारतासह इतर काही देशांचे जहाज या खाडीतून जाऊ दिले जात आहेत. इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सने म्हटले आहे की, ज्या देशांमध्ये अमेरिकेचे लष्करी तळ आहेत, तेथील ऊर्जा केंद्रे आता हल्ल्यांचे टार्गेट असणार आहेत.

जवळपास सर्वच आखाती देशांमध्ये अमेरिकेचे लष्कर तळ आहेत, यामुळे युद्धात आखाती देशांना मोठा फटका बसणार स्पष्ट आहे. इराणसोबतच्या युद्धात अमेरिका आखाती देशांना संरक्षण देऊ शकली नाही. आखाती देशांवर मोठे हल्ले होत आहेत. त्याध्येच आता थेट आखाती देशांच्या ऊर्जा प्रकल्पांना टार्गेट करून हल्ले केले जाणार असल्याचे इराणकडून स्पष्ट शब्दात सांगण्यात आल्याने मोठी खळबळ उडाली.

Follow Us
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?
Video : राम मंदिर दानचोरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
Video : राम मंदिर दानचोरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर