अमेरिकेचा भारताला मोठा धक्का, डोनाल्ड ट्रम्प यांचा सर्वात मोठा निर्णय

मोठी बातमी समोर येत आहे, अमेरिकेनं आता भारताला आणखी एक मोठा धक्का दिला आहे. अमेरिकेनं भारतावर 25 टक्के टॅरिफ लावला आहे.

अमेरिकेचा भारताला मोठा धक्का, डोनाल्ड ट्रम्प यांचा सर्वात मोठा निर्णय
| Updated on: Jul 30, 2025 | 6:31 PM

मोठी बातमी समोर येत आहे, अमेरिकेनं आता भारताला आणखी एक मोठा धक्का दिला आहे. अमेरिकेनं भारतावर 25 टक्के टॅरिफ लावला आहे. येत्या एक ऑगस्टपासून या नव्या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे, दोन्ही देशांमध्ये सर्व काही ठीक नाही असंही यावेळी ट्रम्प यांनी म्हटलं आहे. भारतावर 25 टक्के टॅरिफ लावल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक ट्विट देखील केलं आहे.

नेमकं काय म्हणाले ट्रम्प? 

‘भारत हा आपला मित्र देश असला तरी देखील आपण त्यांच्याशी तुलनेनं कमी व्यावसाय केला आहे.  कारण त्यांचे आयात शुल्क जगातील सर्वात जास्त आहे, आणि त्यांच्याकडे सर्वात कठीण आणि त्रासदायक गैर आर्थिक व्यापार अडथळे आहेत. तसेच त्यांनी त्यांचे बहुतांश लष्करी साहित्य रशियाकडून खरेदी केले आहे, आणि ते रशियाच्या ऊर्जेचे सर्वात मोठे खरेदीदार आहेत. चीनसह ज्यावेळी सर्वजण रशियाला युक्रेनमधील हिंसा थांबवण्यास सांगत आहेत, हे सर्व काही चांगले नाही, त्यामुळे भारताला एक ऑगस्टपासून 25 टक्के आयात शुल्क तसेच वरील कारणासाठी दंड आकारला जाईल, याकडे लक्ष दिल्याबद्दल धन्यवाद,’ असं ट्विट ट्रम्प यांनी केलं आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 25 टक्के टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतला आहे, भारत हा आपला मित्र देश असला तरी देखील आपण त्यांच्याशी तुलनेनं कमी व्यावसाय केला आहे.  कारण त्यांचे आयात शुल्क जगातील सर्वात जास्त आहे, असा दावा त्यांनी केला आहे. मात्र खरं कारण हे भारत हा रशियाकडून खरेदी करत असलेल्या ऊर्जेचं आहे. रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे, भारतानं युक्रेनला सपोर्ट करावा अशी अमेरिकेची भूमिका आहे, मात्र भारताचं धोरण हे राष्ट्र प्रथम असं आहे, जिथे आमच्या राष्ट्राचं हीत आहे, तिथे ते आम्ही जोपासणारच अशी भारताची भूमिका आहे. त्यामुळे ट्रम्प यांनी दबाव निर्माण करण्यासाठी हा निर्णय घेतला असावा, अमेरिका आपला निर्णय मागे घेईल, असं मत अंतरराष्ट्रीय विषयावरील तज्ज्ञांकडून व्यक्त केलं जात आहे.