भारताला सर्वात मोठा धक्का, पाकिस्तानबाबत अमेरिकेची थेट मोठी घोषणा, तब्बल…

पाकिस्तानबाबत अमेरिकेने मोठी घोषणा केली. ज्यामुळे जगाचे मोठे टेन्शन वाढले. पाकिस्तानचे पंतप्रधान गेलया काही दिवसांपासून अमेरिकेच्या फेऱ्या मारत होते शेवटी त्यांना यश मिळाल्याचे बघायला मिळाले.

भारताला सर्वात मोठा धक्का, पाकिस्तानबाबत अमेरिकेची थेट मोठी घोषणा, तब्बल...
Pakistan America
| Updated on: Feb 06, 2026 | 9:00 AM

पाकिस्तान गेल्या काही दिवसांपासून अमेरिकेसोबतची जवळीकता वाढवताना दिसले. भारत आणि अमेरिकेचे संबंध टॅरिफच्या मुद्यात तणावात होते, याचाच फायदा घेण्याचा प्रयत्न पाकिस्तानने केला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानमध्ये मोठी गुंतवणूकही केली. पाकिस्तानचे पंतप्रधान अमेरिकेच्या दाैऱ्यावर काही दिवसांपूर्वीच केले होते, ज्याचे फोटोही पुढे आले. आता नुकताच अमेरिकेने पाकिस्तानबाबत अत्यंत मोठी घोषणा केली. अमेरिकेच्या या घोषणेनंतर शेजारील देशांचा तणाव वाढला. अमेरिकेने पाकिस्तानच्या रेको डिक खाणीत 1.3 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. ही गुंतवणूक प्रोजेक्ट व्हॉल्टचा एक भाग आहे. अमेरिकेच्या या गुंतवणूकींमुळे पाकिस्तानला चांगले दिवस येण्याचा अंदाज आहे. अमेरिकेने गुंतवणूक करावी, याकरिताच पाकिस्तानचे पंतप्रधान सतत अमेरिकेत फेऱ्या मारत होते. शेवटी याबाबत अमेरिकेने मोठी घोषणा केली.

पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात असलेले रेको डिक हे जगातील सर्वात मोठ्या सोन्याच्या आणि तांब्याच्या साठ्यांपैकी एक मानले जाते. प्रोजेक्ट व्हॉल्टची घोषणा डोनाल्ड ट्रम्प यांनी 2 फेब्रुवारी 2026 रोजी केली होती. या प्रकल्पासाठी 10 अब्ज डॉलर्सचे कर्ज मंजूर केले आहे. गेल्या वर्षभरात, EXIM ने प्रमुख खनिज प्रकल्पांसाठी $14.8 अब्ज किमतीचे व्याजपत्र जारी केले आहे.

पाकिस्तानमध्ये $1.3 अब्ज गुंतवणूक अमेरिका करत आहे. यूएस स्ट्रॅटेजिक क्रिटिकल मिनरल रिझर्व्ह म्हणून काम करण्यासाठी 10 अब्ज डॉलर्सची प्लॅन आहे. पाकिस्तानच्या बलुचिस्तानमधील रेको डिक खाण आहे. तिथे जगातील सर्वात मोठे तांबे आणि सोन्याच्या साठ्यांपैकी एक आहे. या क्षेत्रात 5.9 अब्ज धातूचा साठा होता. यासोबतच 41 टक्के तांबे आणि 41.5 दहलक्ष सोने आहे.

पाकिस्तानने अमेरिकेच्या जवळ जात आपला फायदा करू घेतला आहे. मात्र, अमेरिकेच्या या घोषणेनंतर भारत आणि चीनचे टेन्शन वाढले आहे. चीन आणि पाकिस्तानचे संबंध चांगले राहिले आहे. मात्र, ज्याप्रकारे अमेरिकेच्या जवळ पाकिस्तान गेले हे चीनला देखील अजिबात पटले नाही. चीन आणि अमेरिकेतील वाद जगाला माहिती आहे. भारताविरोधात कायमच कारवाई करताना पाकिस्तान दिसतो. त्यामध्येच आता अमेरिकेच्या जवळ पाकिस्तान गेला.