
गेल्या काही दिवसांपासून अमेरिका व्हिसाबाबत धक्कादायक निर्णय घेताना दिसत आहे. H-1B व्हिसासाठी आता तब्बल 88 लाख रूपये फिस लागणार आहे. शिवाय व्हिसाचे नियम प्रचंड कडक केली आहेत. अमेरिकेत जाऊन नोकरी करण्याचे आता सोपे राहिले नाही. कोणत्याही परिस्थितीमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना अमेरिकेत होणारे स्थलांतर रोखायचे आहे. जर तुम्हाला अमेरिकेत राहायचेच असेल तर त्याकरिता तुम्हाला जास्त पैसे मोजावे लागतील, असेही डोनाल्ड ट्रम्प यांनी अगोदरच स्पष्ट केले. डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाकडून सातत्याने व्हिसाच्या नियमात बदल केली जात आहेत. त्यामध्येच आता डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने एक मोठी ऑफर थेट लोकांना दिसली, त्यामध्येच विमानाचे तिकिट तुम्हाला अमेरिकेच्या सरकारकडून फुकटमध्ये दिले जाईल. होय तुम्ही अगदी खरे ऐकले अमेरिकन सरकार तुम्हाला विमान तिकिट विदेशात प्रवास करण्यासाठी देणार आहे.
अमेरिकेच्या होमलँड सिक्युरिटी विभागाने बेकायदेशीर स्थलांतरितांसाठी स्व-देशवापसीसाठी दिली जाणारी आर्थिक रक्कम 1,000 डॉलरवरून तब्बल 3,000 डॉलरपर्यंत वाढवली आहे. याव्यतिरिक्त, जे वर्षाच्या अखेरपर्यंत सीबीपी वन ॲपद्वारे नोंदणी करतील, त्यांना अमेरिकेतून त्यांच्या मायदेशी म्हणजेच त्यांच्या देशात परत जाण्यासाठी मोफत विमान तिकीट देखील मिळेल. ही एक अत्यंत मोठी घोषणा अमेरिकेकडून करण्यात आली.
व्हिसा संपल्यानंतरही अमेरिकेत राहणाऱ्या लोकांना कोणत्याही परिस्थितीमध्ये सरकारला बाहेर काढायचे आहे. त्याकरिता हे मोठे पाऊल उचलण्यात आलंय. 31 डिसेंबरपूर्वी स्वैच्छिक निर्गमनासाठी नोंदणी करणाऱ्या कागदपत्रहीन स्थलांतरितांना 3,000 डॉलर्सची रोख प्रोत्साहन रक्कम, सरकारकडून प्रवास आणि व्हिसा मुदतीपेक्षा जास्त काळ अमेरिकेत राहिलेला दंडही माफ केला जाईल, कोणत्याही प्रकारच दंड त्यांना भरावा लागणार नाही.
यासोबतच डीएचएसने एक इशाराही दिला आहे. त्यांनी स्पष्ट म्हटले की, जे या कार्यक्रमात सहभागी होणार नाहीत, त्यांना थेट अटक केली जाईल आणि अमेरिकेतून काढून टाकले जाईल, त्यांच्यावर कायमसाठी अमेरिकेत प्रवेशबंदी घातली जाईल. आता ज्यांचे व्हिसा संपले आहेत आणि ते अमेरिकेत वास्तव्यास आहेत त्यांनी स्वत: पुढे येऊन होमलँड सिक्युरिटी विभागाशी संपर्क साधला तर त्यांच्यावरील दंड माफ करून त्यांना त्यांच्या देशात पाठवले जाईल आणि भविष्यात त्यांच्यासाठी अमेरिकेचे दरवाजे उघडे असतील. डोनाल्ड ट्रम्प यांच्या दुसऱ्या कार्यकाळात सुरू असलेल्या कठोर स्थलांतरविरोधी मोहिमेचा एक भाग आहे.