अमेरिका करणार आज भारतीयांविरोधात थेट कारवाई, मोठी खळबळ, भारतीयांना त्यांच्या गोपनीयतेशी..
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सातत्याने व्हिसाचे नियम कडक करताना दिसत आहेत. त्यांनी व्हिसावर मोठे शुल्क आकारले. फक्त तेवढेच नाही तर आता त्यांनी नियमातही बदल केला असून त्याचा परिणाम भारतात आज दिसत आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हिसाच्या नियमात मोठे बदल केली आहेत. फक्त व्हिसाच्या नियमातच नाही तर ज्यांना अगोदर व्हिसा देण्यात आले, त्यांचीही कठोर तपासणी केली जाईल. जर असे केले नाही तर थेट अमेरिकेतून बाहेरचा रस्ता दाखवला जाईल. अमेरिकी स्टेट डिपार्टमेंटने H-1B आणि H-4 व्हिजा अर्जदारांचे सोशल मीडिया प्रोफाइल तपासणे सरकारने अनिवार्य केले आहे. हा नवीन नियम 15 डिसेंबर 2025 म्हणजेच आजपासून लागू करण्यात आला आहे. अमेरिकेच्या व्हिसासाठी अर्ज करणाऱ्या लोकांना त्यांचे सोशल मीडिया अकाऊंड आता पब्लिक करावे लागेल. जेणे करून अमेरिकन अधिकारी त्यांचे सोशल मीडियावर अकाऊंट बारकाईने तपासू शकतील. त्यामध्ये त्यांना वेगळे काही वाटले तर जे अमेरिकेचा व्हिसा देखील नाकारू शकतात.
अगोदर ही प्रक्रिया फक्त आणि फक्त विद्यार्थी व्हिसातील कार्यक्रमातील अभ्यागतांसाठीच्या F, M, आणि J व्हिसांना लागू होती. आता ती कुशल कामगारांसाठीच्या H-1B व्हिसा आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांसाठीच्या H-4 व्हिसापर्यंत वाढवण्यात आली आहे. अमेरिका दिवसेंदिवस H-1B व्हिसाच्या नियमात बदल करत आहे. नियम सातत्याने कडक केली जात आहेत. अमेरिकेने अगोदरच H-1B व्हिसावर 88 लाख रूपये शुल्क आकारले आहे. त्यामध्येच आता हा नवीन नियम लागू केला.
या चौकशीचा उद्देश राष्ट्रीय सुरक्षा मजबूत करणे हा आहे. आता प्रत्येक व्हिसा अर्जाचे राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पुनरावलोकन केले जाईल. व्हिसासाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तीचे इंस्टाग्राम, ट्विटर, लिंक्डइन आणि फेसबुक अकाऊंट प्रायव्हसी सेटिंग्ज पब्लिक करण्यास सांगितले आहे. यामुळे अधिकारी सहजपणे तपासणी करू शकतील. जर एखाद्या अर्जदाराने असे केले नाही तर त्याचा व्हिसा मिळण्यास उशीर होऊ शकतो.
या नवीन नियमामुळे भारतातील अनेक H-1B आणि H-4 व्हिसा मुलाखतींच्या तारखा रद्द करण्यात आल्या आहेत. डिसेंबरमध्ये नियोजित असलेल्या अनेक भेटी आता मार्च 2026 साठी पुनर्निर्धारित करण्यात आल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच मुंबईतील दूतावासाने एक निवेदन जारी केले होते आणि त्यामध्येच मोठा इशारा व्हिसा धारकांना त्यांनी दिला होता. यामुळे अमेरिकेत H-1B व्हिसावर जाणाऱ्या लोकांना आता मुलाखतीसाठी थांबावे लागेल. लगेचच अमेरिकेत जाण्याचे त्यांचे स्वप्न पूर्ण होणार नाही.
