तर तुमचा व्हिसा कधीही रद्द होऊ शकतो… मुंबईतील अमेरिकन दूतावासाचा थेट मोठा इशारा, मोठी खळबळ
America Visa : भारत आणि अमेरिकेत गेल्या काही वर्षांपासून चांगले संबंध बघायला मिळाले. मात्र, डोनाल्ड ट्रम्प यांनी असे काही निर्णय घेतले, ज्यामुळे भारत आणि अमेरिकेतील संबंध तणावात आहेत. त्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये भारतासोबत व्यापार करार करायची आहेत.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मागील काही दिवसांपासून सतत व्हिसातील नियमात बदल करत आहेत. H-1B व्हिसाच्या नियमात त्यांनी बदल केल्याने जगात खळबळ उडाली. H-1B व्हिसावर जाऊन अमेरिकेत नोकऱ्या करण्यामध्ये भारतीयांची संख्या सर्वात जास्त आहे. आता H-1B व्हिसासाठी 88 लाख रूपये शुल्क भरावे लागणार आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेल्या या निर्णयाला अमेरिकेतूनही मोठा विरोध झाला. आयटी कंपन्या अडचणीत आल्या. हेच नाही तर जगाच्या कानाकोपऱ्यात असलेल्या आपल्या कर्मचाऱ्यांना तात्काळ अमेरिकेत हजर होण्याचे निर्देश कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना दिले होते. यासोबतच H-1B व्हिसा असलेल्या कर्मचाऱ्यांना अमेरिकेच्या बाहेर न पडण्याच्याी सूचना दिल्या होत्या. डोनाल्ड ट्रम्प सतत व्हिसाच्या नियमात बदल करत आहेत. ज्यामुळे अमेरिकेत जाऊन नोकरी करणाऱ्यांचे स्वप्न स्वप्नच राहू शकते.
त्यामध्येच आता मुंबईतील अमेरिकन दूतावासांनी एक महत्वपूर्ण माहिती दिली आहेत. अमेरिकेच्या कायद्यांचे किंवा इमिग्रेशन नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्हिसाधारकांना डिपोर्ट म्हणजेच मायदेशी रवानगी केली जाईल. या इशाऱ्यामुळे डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने लागू केलेल्या कठोर इमिग्रेशन नियमांमधून कोणताही दिलासा मिळणार नाही, हे स्पष्ट झाले आहे. मुंबईतील अमेरिकन दूतावासांनी एक्सवर एक पोस्ट शेअर करत त्याबद्दलचे निवेदन जारी केले आहे.
दूतावासाच्या निवेदनानुसार, व्हिसा जारी झाल्यानंतर अमेरिकन व्हिसाधारकांची तपासणी थांबत नाही. सर्व अमेरिकन कायदे आणि इमिग्रेशन नियमांचे पालन केले जात आहे की नाही, हे सुनिश्चित करण्यासाठी आम्ही व्हिसाधारकांची सातत्याने तपासणी करतो. जर कोणी या नियमांचे पालन केले नाही तर आम्ही त्यांचे व्हिसा रद्द करून त्यांना त्यांच्या मायदेशात डिपोर्ट करू, असे अमेरिकेने स्पष्टपणे म्हटले आहे.
आता थेट इशाराच मुंबईतील अमेरिकन दूतावासाने दिला आहे. तुमचा व्हिसा रद्द होऊ शकतो, असेही त्यांनी म्हटले. गेल्या काही दिवसांपासून डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून व्हिसाच्या नियमात सातत्याने बदल केला जात आहे. त्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये इतर देशांचे नागरिक अमेरिकेत नको आहेत. भारत आणि चीनसह लोक व्हिसावर अमेरिकेत येतात आणि नोकरी करून मोठी कमाई करून पैसा आपल्या देशात पाठवतात, असा आरोप त्यांनी केला होता.
