डोनाल्ड ट्रम्प पडले तोंडावर, सर्वात मोठा झटका, थेट या देशाने दिला धक्का देत सात…
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मागील काही दिवसांपासून सतत जगातील मोठी सात युद्धे रोखल्याचा दावा करत आहेत. त्यामध्येच आता डोनाल्ड ट्रम्प यांना अत्यंत मोठा धक्का बसला. आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेला दावा खोटा ठरला.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मागील काही दिवसांपासून सतत दावा करत आहेत की, त्यांनी जगातील मोठी सात युद्धे रोखली आहेत. मात्र, आता डोनाल्ड ट्रम्प यांना अत्यंत मोठा झटका बसला. डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धविरामाची घोषणा केल्यानंतर काही तासांतच कंबोडियाने थायलंडवर गंभीर आरोप केले आहेत. कंबोडियाने दावा केला आहे की, युद्धविरामावर सहमती दर्शवल्यानंतरही थायलंडने त्यांच्यावर हवाई हल्ले सुरूच ठेवले आहेत. गेल्या काही दिवसांपासून डोनाल्ड ट्रम्प यांचा रस दोन देशातील युद्ध रोखण्याकडे वाढला आहे. नोबेल पुरस्कार मिळवण्यासाठी त्यांनी अनेक प्रयत्न केली. हेच नाही तर स्पष्ट बोलताना दिसले की, मी जगातील मोठी सात युद्धे रोखली असून नोबेल पुरस्कार हा मलाच मिळायला हवा. मात्र, नोबेल पुरस्कार मिळाला नसल्याने ते चांगलेच नाराज झाले.
डोनाल्ड ट्रम्प यांनी कंबोडिया आणि थायलंड यांच्यातील युद्ध रोखल्याचा दावा केला आणि तशी घोषणा देखील केली. मात्र, आता गंभीर आरोप केला असून हे युद्ध थांबले नसून कंबोडियावर हल्ले सुरूच आहेत. कंबोडियाच्या संरक्षण मंत्रालयाने एक्सवर एक पोस्ट शेअर केली. त्यांनी निवेदनात स्पष्ट म्हटले की, थायलंडच्या सैन्याने शनिवारी त्यांच्या हद्दीत हल्ले केली आहेत.
निवेदनातील माहितीनुसार, 13 डिसेंबर 2025 रोजी थाई सैन्याने दोन एफ-16 लढाऊ विमानांचा वापर करून कंबोडियाच्या हद्दीत सात बॉम्ब टाकले. युद्धविरामाची घोषणा केल्यानंतर हा हल्ला झाल्याने एकच खळबळ उडाली. कंबोडियाकडून करण्यात आलेल्या या आरोपांवर कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया अद्याप थायलंडकडून देण्यात आली नाही. डोनाल्ड ट्रम्प यांनी कंबोडिया आणि थायलंडमधील युद्धबंदीबाबत घोषणा केली होती.
ब्लूमबर्ग वृत्तसंस्थेच्या अहवालानुसार, थायलंडने सांगितले होते की, काही दिवसांपूर्वीच झालेल्या हिंसाचारामध्ये त्यांचे 10 सैनिक मारले गेले. यासोबतच अनेक सैनिक गंभीर जखमी झाले. तर दुसरीकडे कंबोडियाने म्हटले होते की, एका लहान मुलासह आमचे दहा नागरिक थायलंडच्या हल्लात गेले. डोनाल्ड ट्रम्प यांनी शांतता करार केल्याची घोषणा करत युद्ध बंदी झाल्याचे म्हटले. मात्र, अजूनही दोन्ही देशांच्या सीमेवर तणाव बघायला मिळतोय.
